ताज्या घडामोडी

अ. भा. म. नाट्य परिषद तळेगाव दाभाडे मावळ शाखेचा १७ वा वर्धापनदिन संपन्न.

राजकारणातले पद कधीही जाऊ शकते पण सांस्कृतिक कार्यामुळे मिळालेली जनतेच्या हृदयातील जागा चिरंतन असते ........भाऊसाहेब भोईर

राजकारणातले पद कधीही जाऊ शकते पण सांस्कृतिक कार्यामुळे मिळालेली जनतेच्या हृदयातील जागा चिरंतन असते ……..भाऊसाहेब भोईर
….अ. भा. म. नाट्य परिषद तळेगाव दाभाडे मावळ शाखेचा १७ वा वर्धापन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेचा १७ वा वर्धापन दिन सेवा धाम ग्रंथालयाच्या प्रांगणात दिमाखात संपन्न झाला.
“राजकारणातले पद कधीही जाऊ शकते पण सांस्कृतिक कार्यामुळे मिळालेली जनतेच्या हृदयातील जागा चिरंतन असते”….असे अखिल भारतीय मराठी नाट्यपरीषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
वर्धापन दिन समारंभाची सुरुवात तळेगाव शाखेच्या बालनाट्य शिबिरार्थींनी सदर केलेल्या प्रार्थना गीताने झाली.
संतसाहित्य,आणि लोककलेचे गाढे अभ्यासक डॉ रामचंद्र देखणे समारंभाचे अध्यक्ष होते तर मा.गणेश खांडगे ( अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस मावळ तालुका) व मा.भाऊसाहेब भोईर (अखिल भारतीय मराठी नाट्यपरीषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे संस्थापक अध्यक्ष), मा.वृषाली राजे दाभाडे सरकार, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
मंचावर मा.सुरेश साखवळकर (विश्वस्त अ.भा.म.ना.प.तळेगाव शाखा व संपादक सा.अंबर), मा.सुरेश धोत्रे (संस्थापक अध्यक्ष अ.भा.म.ना.प.तळेगाव दाभाडे शाखा),मा.गणेश काकडे (कार्याध्यक्ष अ.भा.म.ना.प.तळेगाव दाभाडे शाखा) उपस्थित होते.
या वर्षी सुप्रसिद्ध सिने – नाट्य अभिनेते माधव अभ्यंकर (रात्रीस खेळ चाले…फेम) यांना कलागौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. संतोष साखरे (नाट्य निर्माते व नाट्य कर्मी पिंपरी चिंचवड ),डॉ.विनया केसकर (पत्रकार,लेखिका व रंगकर्मी) व डॉ.मीनल कुलकर्णी (नृत्य अभ्यासक,रंगकर्मी व सृजन नृत्यालय संचालिका) या कलाकारांचा त्यांच्या कला क्षेत्रातील योगदाना विशेष गौरव करण्यात आला.

या वर्षी तळेगावच्या सांस्कृतिक आणि नाट्य चळवळीला महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या, तळेगावच्या सांस्कृतिक चळवळीचे नाव जगाच्या रंगभूमीवर गाजविणाऱ्या कलापिनीचे विश्वस्त, ध्यास पुरुष डॉ.अनंत शं.परांजपे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
माझा गौरव हा माझे वडील कै.डॉ.शं.वा.परांजपे यांनी रुजवलेल्या तळेगावातील नाट्य चळवळीचा, कलापिनीचा गौरव आहे असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेने केलेला गौरव हा आमच्या मनाला खुप आनंद देणारा आहे असे आपले मनोगत व्यक्त करताना विशेष गौरवार्थी डॉ.मीनल कुलकर्णी आणि डॉ.विनया केसकर यांनी सांगितले.
कला गौरव पुरस्काराचे मानकरी सिने नाट्य अभिनेते माधव अभ्यंकर कलागौरव पुरस्कारा बद्दल कृतज्ञता व्यक्त केली व आपण तळेगावकर झालो असल्याचे सांगून या पुढे तळेगाव आणि कलापिनीच्या नाट्य चळवळीत सक्रीय सहभाग घेणार असल्याचे सांगितले .
डॉ.रामचंद्र देखणे यांनी नाटक हा पाचवा वेद आहे असे सांगून डॉ.अनंत परांजपे यांना जीवन गौरव पुरस्कार योग्य वेळी देऊन त्यांच्या योगदानाचा उचित गौरव केल्याबद्दल तळेगाव नाट्य परिषदेचे कौतुक केले.
तळेगाव आणि मावळ परिसरातील सांस्कृतिक चळवळीत योगदान करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना सहाय्य करण्यासाठी आणि त्याचा यथोचित सन्मान करण्यासाठी नाट्य परिषदेची तळेगाव शाखा कायमच कटिबद्ध असल्याचे आपल्या प्रास्ताविकात अ.भा.म.ना.प.तळेगाव दाभाडे शाखचे संस्थापक अध्यक्ष मा.सुरेश धोत्रे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला तळेगावचे समाज भूषण डॉ.कृष्णराव वाढोकर,मा.नगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी ,हरिश्चंद्र गडसिंग ( हेरीटेज संगीत अकादमी संचालक), ओव्हाळ, चंद्रकांत भिडे (बांधकाम व्यवसायिक),विठ्ठल शिंदे हे मान्यवर उपस्थित होते.
तेजस धोत्रे (वास्तू विशारद) आणि गणेश काकडे (बांधकाम व्यवसायिक) हे या समारंभाचे प्रायोजक होते

या शानदार सोहळ्याचे अभ्यासपूर्ण आणि ओघवते सूत्र संचालन तळेगाव निवेदिका माधुरी कुलकर्णी ढमाले यांनी करून समारंभाची रंगत वाढविली.
नाट्य परिषद कार्यकारिणी सदस्य सुरेश दाभाडे यांनी आभार मानले

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संतोष साखरे, डॉ.मिलिंद निकम, सुरेश दाभाडे, मिथिल धोत्रे, राजेश बारणे, नितीन शहा, संग्राम जगताप, प्रसाद मुंगी, भरत छाजेड, क्षिप्रसाधन भरड, नयना डोळस,विवेक क्षिरसागर(सागर मुव्हीज) दत्त मंडप आकुर्डी, सुमेर नंदेश्वर (ध्वनी व्यवस्था) आणि विश्वास देशपांडे यांनी विशेष मेहनत घेतली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!