ताज्या घडामोडी

पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले  यांना येस बँक, डीएचएफएल प्रकरणात सीबीआयने अटक केली.

पुणे : पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले  यांना येस बँक, डीएचएफएल प्रकरणात सीबीआयने अटक केली आहे. . गेल्या काही दिवसांमध्ये अविनाश भोसले यांच्या पुणे-मुंबई परिसरात सीबीआयने छापेमारी केली होती, त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे.
भोसले यांच्या घरावर एप्रिल महिन्यातच सीबीआयने छापे टातले होते. तर मागील वर्षी “सीबीआय’ने (CBI) त्यांची तब्बल ४०.३४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.
मागील काही वर्षांपासून येस बॅंक व डीएचएफएल प्रकरणाचा तपास “सीबीआय’ (CBI) कडून सुरु आहे. त्यांनी यापुर्वी उद्योजक संजय छाब्रिया यांना अटक केली आहे, तर विनोद गोएंका व शाहीद बलवा यांच्यावरही कारवाई केली आहे. दरम्यान, याच बॅंक गैरव्यवहार प्रकरणामध्ये भोसले यांचेही नाव पुढे आले होते. त्यानुसार, “सीबीआय’कडून भोसले यांचा तपास सुरु होता. भोसले यांचे घर व काही मालमत्तांवर एप्रिर महिन्यात “सीबीआय’ने छापे टाकून काही मोठ्या प्रमाणात झाडाझडती घेतली होती. त्याचवेळी त्यांच्या मालमत्तांमधून महत्वाची कागदपत्रेही त्यांनी जप्त केली होती.
४०. ३४ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या होत्या

  1. “सीबीआय’  ने मागच्या वर्षी भोसले यांच्या मुंबई व पुण्यातील “एबीआयएल’ कंपनी, घरामध्येही छापे टाकले होते. भोसले व त्यांच्या कुटुंबाच्या ४०. ३४ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या होत्या. भोसले हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, उद्योजक असून त्यांचा मुंबई व पुण्यात बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची प्रशस्त कार्यालये आहेत. तर पाषाणमध्ये येथे भोसले यांचे आलिशान निवासस्थान आहे. भोसले यांना यापूर्वीही विदेशातून कर चुकवून मौल्यवान वस्तू घेऊन येताना सीमाशुल्क विभागाने विमानतळावर ताब्यात घेतले होते. दरम्यान, सीबीआयने गुरुवारी सायंकाळी भोसले यांना त्यांच्या घरातून अटक केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!