ताज्या घडामोडी

कांब्रे ना.मा.ग्रामपंचायत हद्दीतील कोंडीवडे येथील स्मशानभूमीसाठी लोकप्रिय खासदार मा.श्रीरंग आप्पा बारणे यांच्या निधीतून 5 लक्ष

मावळ न्यूज:कांब्रे ना.मा.ग्रामपंचायत हद्दीतील कोंडीवडे येथील स्मशानभूमीसाठी लोकप्रिय खासदार मा.श्रीरंग आप्पा बारणे यांच्या निधीतून 5 लक्ष तसेच
कार्यसम्राट जि.प.सदस्या श्रीमती शोभाताई सुदाम कदम यांच्या निधीतुन 6 लक्ष असा एकुण 11 लक्ष निधीतुन उपलब्ध झाल्याने आज स्मशानभूमीचे भूमीपूजन
मावळ तालुका शिवसेनाप्रमुख   राजु खांडभोर , मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटनमंत्री , नारायण ठाकर,   .देवा गायकवाड , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष,  समीर सुदाम कदम, यांच्या शुभहस्ते भूमीपूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांना सन्मानीत करण्यात आले.
तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 15 वित्त आयोगातुन 2.5 लक्ष अंतर्गत बंदिस्त गटार कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
त्याचप्रमाणे जि.प.सदस्या श्रीमती शोभाताई सुदाम कदम यांच्या प्रयत्नातून व समाजकल्याण निधीतुन 3 लक्ष उपलब्ध करून कांब्रे येथील दलितवस्ती मधील हायमास्क बसविल्यानंतर उद्घाटन करण्यात आले.
यावेळी विद्यमान सरपंच .सुवर्णाताई गायकवाड, उपसरपंच         किरण गायकवाड, सदस्य .स्वामी गायकवाड,
मारूती गायकवाड
सदस्या  कविताताई गायकवाड, सिमाताई गायकवाड,   पिंकीताई राऊत, पोलीस पाटील . रोहीणीताई अतुल चोपडे, मा. सरपंच मा.. भाऊसाहेब दाभणे, जेष्ठ नेते मा. तुकाराम धुमाळ, . भरत गायकवाड
. अनिल गायकवाड, .ज्ञानेश्वर दाभणे, युवा नेते. मारुती गायकवाड, सचिन गायकवाड, हेमंत राऊत, अनिल गायकवाड ,. संतोष शिंदे तसेच तरूण सहकारी व जेष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यमान सदस्य .स्वामी गायकवाड यांनी केले. यावेळी तालुकाप्रमुख  राजु खांडभोर , संघटनमंत्री . नारायण ठाकर, जनसेवक देवा गायकवाड व विद्यार्थी अध्यक्ष समीर सुदाम कदम यांनी मनोगत व्यक्त  केले. तसेच जेष्ठ नेते . तुकाराम मामा धुमाळ यांनी ग्रामपंचायत करत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून कौतुक केले व सर्वांचे आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!