ताज्या घडामोडी

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प आंदोलनातील शहिदांसाठी १०व्या स्मृती दिनानिमित्त श्रद्धांजली सभेचे आयोजन

पवना : बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर झालेल्या मावळ गोळीबाराच्या घटनेला १०वर्षे पूर्ण झाले यानिमित्ताने या गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या १०व्या स्मृती दिनानिमित्त येळसे (पवनानगर) येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी येळसे गावातून स्मृती ज्योत पेटवून गोळीबारात शाहिद झालेले शेतकरी कै.कांताबाई ठाकर, कै.शामराव तुपे, कै.मोरेश्वर साठे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

पवना ही मावळच्या शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे या पवणाचे पाणी बंदिस्त जलवाहिनी मधुन घेऊन गेले तर सिंचनाखालील जमीन पडीक होऊन आमचा शेतकरी बांधव रस्तावर येईल त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल म्हणुन आम्ही मावळ वासीयांना उघडे पडू देणार नाही व मावळ उजोड होऊ देणार नाही आमचा या बंदिस्त जलवाहिनीने पाणी घेऊन जाण्यास विरोध होता आहे आणि कायम रहिल या विरोधात ज्या शेतकऱ्यांनी प्राणपणाला लावून, स्वतःचे बलिदान दिले, त्यांचे बलिदान वाया जावू देणार नाही. कोणीही कितीही प्रयत्न केले तरीही बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमचा बंद होत नाही तो पर्यंत आमचा संहर्ष हा अविरतपणे सुरू होता आणि कायमस्वरूपी राहील

यावेळी  मा.राज्यमंत्री बाळा भाऊ भेगडे ,काँग्रेस जेष्ठ नेते दिलीप ढोले, मा.एकनाथराव टिळे मा.सभापती गुलाबराव म्हाळस्कर,एकनाथराव टिळे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे,ज्ञानेश्वर दळवी,मा.उपसभापती जिजाबाई पोटफोडे,संचालक शिवाजी मामा पवार,जिल्हा परिषद सदस्य अलकाताई धानीवले,ज्योतीताई शिंदे सभापती, किरण भाऊ राक्षे सरचिटणीस भाजपा, शामराव राक्षे, युवाध्यक्ष संदीप काकडे,प्रशांत ढोरे,बाळासाहेब घोटकुले,संदीप भुतडा,नारायण भालेराव, दत्ता भाऊ शेवाळे, गणेश ठाकर,मुकुंद ठाकर,भारतीय किसान संघाचे अनंत चंद्रचूड,ललिताताई साठे,अनंता कुडे व शहिद कुटुंबातील सदस्य आदी लोकप्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!