ताज्या घडामोडी

मातृछाया जनसेवा फाउंडेशन च्या वतीने वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सरचिटणीस व राष्ट्रीय सेवा समूहाचे संस्थापक अध्यक्ष राहुल भाऊ पोकळे व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयेश भाऊ अहिरे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.

मातृछाया जनसेवा फाउंडेशन च्या वतीने वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.                                               आवाज न्यूज:मातृछाया जनसेवा फाउंडेशन च्या वतीने पदाधिकारी वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर चे आयोजन करण्यात आले होते. छायाबाई अहिरे ,सुनीताताई गरुड, पंडित अहिरे, गणेश हागे ,अमर शिंदे, आप्पासाहेब ढेकळे, इत्यादी पदाधिकारी यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबिराचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सरचिटणीस व राष्ट्रीय सेवा समूहाचे संस्थापक अध्यक्ष राहुल भाऊ पोकळे व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयेश भाऊ अहिरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी राज्य महिला महासचिव सुनीताताई गरुड, महाराष्ट्र राज्य संघटक जयईश्वर अहिरे ,पश्चिम महाराष्ट्र आरोग्य सल्लागार प्रमुख डॉक्टर स्मिता भंगाळे ,पश्चिम महाराष्ट्र आरोग्य सल्लागार प्रमुख प्रवीण सर ,पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्क प्रमुख संतोष डूमे , सोलापूर जिल्हा अध्यक्ष अमर शिंदे, पश्चिम महाराष्ट्र संस्कृती विभाग उपाध्यक्ष गणेश हागे, पुणे जिल्हा आरोग्य महिला सल्लागार प्रमुख जयश्री बलकवडे, प्रकल्प संचालिका वैशाली अहिरे, भारती अहिरे, हर्षला आहिरे, इत्यादी फाऊंडेशनचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयेश भाऊ अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना सांगितले की वाढदिवस साजरा करत असताना सामाजिक सेवेचे भान ठेवणे काळाची गरज आहे त्यामुळे सामाजिक कार्यक्रम राबवणे अति आवश्यक आहे. तसेच, पुणे जिल्हा सल्लागार प्रमुख जयश्री बलकवडे यांनी आरोग्यविषयी समस्त पदाधिकारी व नागरिकांना आरोग्य विषयी योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.. समस्त पदाधिकाऱ्यांची वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर वस्ताद हरिभाऊ पोकळे प्राथमिक शाळा या ठिकाणी घेण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शन शाळेच्या मुुुख्याध्यापिका संतोषी हिरेमठ मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!