ताज्या घडामोडी

मावळात आमदार सुनिल शेळके यांनी एक हजार कोटीचा निधी आणला :जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर.

लोणावळेकरांची गरज म्हणून पर्यटनाला चालना देण्यासाठी ३५ कोटीचा स्काय वाॕक बाांधणार आहोत.ग्लासवाॕकचीही निर्मिती केली,तर मोठे काम होईल.

  मावळात आमदार सुनिल शेळके यांनी एक हजार कोटीचा निधी आणला :जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर
आवाज न्यूज, लोणावळा ता.१५(प्रतिनिधी ) मावळात आमदार सुनिल शेळके यांनी एक हजार कोटीचा निधी आणला. सुमारे ८०० कोटीच्या कामांचे टेंडर काढून कामे सुरू केली आहेत. कारण पुणे जिल्ह्यातील    पालकमंञी, आजितदादा यांचे रूपाने लाभला आहे. माझा लोणावळा सर्वांगसुंदर झाला पाहिजे. चांगले इन्फ्रास्ट्रक्चर देवू शकलो , तर आदर्श गाव म्हणून लोणावळ्याची ओळख होईल. लोणावळ्याच्या सत्तावीस जागांसाठी निवडणूक होत असून सत्तावीस जणच , लढले तरी काम होणार नाही.तुम्ही सर्वांनी मनावर घेतल्यास काम होईल. मी इंदापूरचा नगराध्यक्ष असताना सफाई कामगार संपावर गेले. मी प्रत्येक वार्डात १५०- २०० कार्यकर्ते यांना विश्वासात घेतली. सर्वजण कचराकुंडी ते साफसफाई कामे करत होते. काही दिवसांनी साडेचारशे ते पाचशे टप-या बांधून बेरोजगार युवकांना रोजगार दिला. आदर्श कामकाज केल्यानंतर संपकरी कामावर रूजू झाले.
लोणावळा व मावळातील जुनी जाणकार मंडळी पक्षात आली आहेत. तुम्ही मतदारांनी व कार्यकर्त्यांनी सुनिल   शेळकेेंच्या   रूपाने मावळाला सन्मान दिला.सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असल्याने कार्यकर्त्यांनी समर्थन दिले. आक्रमक व कडवट कार्यकर्ता असल्यावर लोणावळा व तळेगाव नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता यायला वेळ लागणार नाही,असे राष्ट्रवादीचे :जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. यावेळी आमदार सुनिल शेळकेे, व गारटकर यांचा सत्कार शहराध्यक्ष विलासभाऊ बडेकर , सरचिटणीस रविंद्र पोटफोडे , युवक पदाधिकारी धनंजय काळोखे , राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष अजिंक्य टकले , शहराध्यक्ष विनोद होगले , माजी शहराध्यक्ष जीवन गायकवाड , जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष भरत उर्फ साहेबराव टकले , माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर , तसेच भरत हारपुडे आदींच्या हस्ते झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळंज , आदर्श माजी सरपंच सौ. वत्सला वाळंज , माजी नगरसेविका शीलाताई बनकर , जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष भरत टकले , प्रकाश हारपुडे , प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे , राजू बोराटी , माजी नगराध्यक्ष अरूण मोरे काका , शामराव पाळेकर , अरविंदभाई मेहता यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार सुनिल शेळके म्हणाले, ”लोणावळ्यात आज मेळाव्यास उपस्थित राहण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्वजस्तंभाचे उद्घाटन करण्याचे भाग्य लाभले. येथील शहराध्यक्ष अनुभवी कार्यकर्ते विलासभाऊ बडेकर तालुकाध्यक्ष गणेश खांडगे , युवकचे तालुकाध्यक्ष किशोर सातकर , जिल्हा महिलाध्यक्षा दिपाली गराडे , हेमलता रेड्डी , शहराध्यक्षा सो.उमा मेहता , प्रांतिक सदय्य बाळासाहेब पायगुडे यांनी नियोजन केल्याने बारावीचे विद्यार्थांना स्मृतीचिन्हे देता आली. आनाथाश्रमामधील १०० मुलांना पावसापूर्वी बूट देऊ शकलो. लोणावळेकरांची गरज म्हणून पर्यटनाला चालना देण्यासाठी ३५ कोटीचा स्काय वाॕक बांधणार आहोत.ग्लासवाॕकचीही निर्मिती केली,तर मोठे काम होईल.
भाजपचे सत्तेत असलेल्या लोकांनी जिथे काम होत नाही तिथे आमचा अपप्रचार केला. रेल्वेकडून व नगरपरिषदेकडे माहिती घेता समजले की रेल्वेवरील उड्डाणापूल नांगरगाव ते भांगरवाडी हा ९ कोटीचा खर्चाचा असून २ कोटी ३६ लाख दिले , बाकी ६कोटी ५० लाख निधी दिला जात नाही. या शहरातील मूलभूत प्रश्न गंभीर असल्याने दीड कोटी निधी नगराध्यक्षा यांचे सहीने दिला ;तो कसा दिला. त्याचे व्याजासह साडेतीन ते ४कोटी झाले आहेत,ते वसूल केल्याशिवाय गप्प बसणार नाही , असे श्री.सुनिल शेळके यांनी खडसावून सांगितले .खाऊगल्लीच्या नावाखाली टाॕवरलाईन खालील चार कोटीची जागा बारा कोटीला घेण्याचा मागील सत्ताधारी यांचा मनसुभा होता.सहा कोटीचे ऐवजी बारा कोटी द्यायला निघाले होते.ते निम्म्याला निम्मे भागीदार व्हायला निघाले होते. भ्रष्टाचार मुक्त लोणावळा करण्यासाठी लोणावळेकरांनी राष्ट्रवादी चे उमेदवार निवडून द्यावे , आजच्या घडीला कै.दिपकभाऊ मानकर या हाडाच्या कार्यकर्त्यासारखे निस्वार्थी कार्यकर्ते घडायला हवेत,असे  शेळके म्हणाले .  [ राज्याचे उपमुख्यमंञी आजितदादा पवार यांनी आणखी ८५ लाख निधी लोणावळ्याच्या करीता विकासकामासाठी द्यावा, असे अवाहन शेळके यांनी केले. ]
यावेळी माजी नगरसेवक मनोज पाळेकर , नारायण पाळेकर , युवकचे सन्नी पाळेकर , आजिंक्य कुटे , आदी शेकडो पदाधिकारी व युवती , कार्यकर्ते उपस्थित होते.शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शहराध्यक्ष बडेकर यांनी केले , रवी पोटफोडे यांनी सूञसंचालन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!