ताज्या घडामोडी

मुळशी तालुक्यातील वाघवाडी ( वडगाव – ताम्हिणी) येथे अतिवृष्टीमुळे जमिनीला भेगा, ग्रामस्थ भयभीत…

प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी पाहणी करत नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

मुळशी तालुक्यातील वाघवाडी ( वडगाव – ताम्हिणी) येथे अतिवृष्टीमुळे जमिनीला भेगा, ग्रामस्थ भयभीत

आवाज न्यूज:पौड प्रतिनिधी,मागील एक आठवड्यापासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुळशी तालुक्यातील वडगाव वाघवाडी येथील वाघ पाटील वस्ती येथे डोंगराच्या पायथ्याला असलेल्या जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. उंच डोंगराच्या पायथ्याला असलेल्या जमिनीला भेगा पडल्याने येथील सर्व घरे राहण्या योग्य राहि नसून काही घराची पडझड देखील झाली आहे. सिमेंट रस्त्यांना तडे गेल्याने माळीनची पुनरावृत्ती होण्याचा धोका निर्माण झाला आहे त्यामळे ग्रामस्थ देखील भयभीत झाले आहेत तर प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी पाहणी करत नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

मुळशी धरण भागात धरणाचे पाणी व डोंगराच्या मधोमध वडगाव वाघवाडी हे गाव आहे. या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे येथील घरामागील शेतजमिनीला भेगा पडलेल्या आहेत. येथील १८ कुटुंबे या पडलेल्या भेगांमुळे भयभीत झालेत.. असून यातील १६ नागरिकांची वाघवाडी जिल्हा परिषद शा आणि ग्रामपंचायत इमारतीत तात्पुरती निवासाची व्यवस्था करण्यात आला आहे.

गटविकास अधिकारी संदीप जठार, तलाठी संकेत आव्हाड, ग्रामसेवक विजय कुदळे यांनी भेगा पडलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी सरपंच अर्चना वाघ, सुभाष वाघ, लक्ष्मण वाघ, माजी पोलिस पाटील सुनील रसाळ, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर वाघ, मारुती वाघ, नारायण वाघ, हिरामण वाघ, अमित वाघ उपस्थित होते.

मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बेसुमार झाडांची कत्तल करण्यात आली. वनसंपदेचा -हास होत आहे. त्यातच अमूल्य अशी माती वाहून जाऊन डोंगराचा पोत घसरत आहे. दगड उघडे पडत आहे. भूगर्भातील हालचाली, जागतिक वातावरणातील बदल अशा अनेक गोष्टी मुळशी तालुक्याचे सौंदर्य असणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगात प्रकर्षाने जाणवत आहे. एकेकाळी रक्षक अशी ओळख असणारा सह्याद्री गावचा भक्षक होतो की काय अशी चिंता नागरिकांना पडले आहे. लाल फितीचा कारभार सर्वांनाच माहीत असल्याने गावचे पुनर्वसन कधी होणार हा प्रश्न ?

या पडलेल्या भेगा धोकादायक असून केव्हाही भुस्खलन होऊ शकते. पाऊसाचे दिवस असून येथील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था

करण्यात आलेली आहे टाटा कंपनी व शासनाच्या वतीने पक्की घराची व्यवस्था करण्याची मागणी येथील सरपंच अर्चना सुभाष वाघ यांनी केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!