ताज्या घडामोडी

केंद्र सरकारने तातडीने वस्तु व सेवा” कर (GST) रद्द करावा व निर्णयाची अंमलबजावणी मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस पक्षाला या विरोधात तिव्र आंदोलन करावे लागेल.

  मा. उपविभागीय अधिकारीसो इचलकरंजी विभाग, यांंना निवेदन देण्यात आले .

 

आवाज न्यूज इचलकरंजी प्रतिनिधी:२० जुलै केंद्र सरकारने जिवनावश्यक वस्तु वरील लागू केलेला “वस्तु व सेवा” कर रद्द करणेबाबत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी  इचलकरंजी शहर काँग्रेस    मा. उपविभागीय अधिकारीसो इचलकरंजी विभाग, यांंना निवेदन देण्यात आले .

देशामध्ये वस्तु व सेवा कराची अंमलबजावणी सुरु होवून पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. तथापि सदरचा कर लागू होवूनसुध्दा अद्यापही केंद्र सरकारला वस्तु व सेवा करामध्ये सातत्याने बदल करावा लागत आहे. त्या धोरणाचा भाग म्हणून केंद्र सरकारने दिनांक १८ जुलै २०१२ पासून जिवनावश्यक वस्तुवर देखील “वस्तु व सेवा” कराची आकारणी करणेचे धोरण अंमलात आणले आहे. केंद्र सरकारच्या या धोरणामध्ये सर्वसामान्य जनतेला आवश्यक असणा-या पीठ, पनीर, दही इ. वस्तूंवर ५% जी.एस.टी. तसेच विद्यार्थ्यांना लागणारे पेन्सील, शार्पनर, लेखनसामुग्री यावर १२ ते १८% जी.एस.टी. लागू केला आहे. तसेच बँकींग व्यवहारातील खातेदारांना आवश्यक असणारे चेकबुकवरील शुल्कावर १८% जी. एस. टी. भरावा लागणार आहे.

वरील सर्व आवश्यक बाबीवरील केंद्र सरकारने वाढवलेल्या वस्तु व सेवा करामुळे महागाईमध्ये प्रचंड वाढ होणार आहे. मुळामध्ये २ वर्षाच्या कोरोना काळातील मंदीतून जग सावरत असताना भडकलेले इंधन दर यामुळे देशामध्ये महागाईचा आलेख सातत्याने चढता राहीलेला आहे. यापूर्वी जिवनाश्यक वस्तूंवर अथवा अन्नधान्य, पनीर, दही या वस्तूंवर कोणताही कर लावला जात नव्हता मात्र सध्या लागु केलेल्या या कराच्या ओझ्यामुळे सर्वसामान्य माणसाला प्रचंड महागाईला तोंड दयावे लागणार आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय अत्यंत निषेधार्ह असून केंद्र सरकारने तातडीने या निर्णयाची अंमलबजावणी मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस पक्षाला या विरोधात तिव्र आंदोलन करावे लागेल.

राहुल खंजिरे, माजी नगरसेवक, मिना बेडगे महिला अध्यक्षासंजय कांबळे अध्यक्ष, शशांक बाचकर सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी  इचलकरंजी शहर काँग्रेस

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!