ताज्या घडामोडी

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी , रथ , आणि शेकडो दिंड्यांचे आणि परतलेल्या हजारो वारकऱ्यांचे देहु नगरीत आगमन.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी , रथ , आणि शेकडो दिंड्यांचे आणि परतलेल्या हजारो वारकऱ्यांचे देहु नगरीत आगमन.

आवाज न्यूज देहु ता.२६(प्रतिनिधी ) जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी , रथ , आणि शेकडो दिंड्यांचे आणि परतलेल्या हजारो वारकऱ्यांचे देहु नगरीत रविवारी ता.२४ रोजी आषाढी एकादशी दिवशी उत्साहात , नगारा वादन , टाळ , मृदूंगाचे घोषात आगमन झाले. शेकडो वारकरी व भाविकांकडून पालखीला , रथाला सामोरे जात माळवाडी , चिंचोली पर्यत जावून पंढरपूर येथून विठुरायाची भेट घेवून परतलेल्या जगद्गुरू तुकोबांचे पादुका दर्शन आणि वारकऱ्यांचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. देहुनगरीला भक्तीरसाचा महापूर आल्याने वातावरण चैतन्याने भारून गेलेले पहायला मिळाले.
श्री पांडुरंग भेटीहून आलेले वारकरी बिलकुल न थकता , मोठ्या आवाजात अभंग , हरिपाठ , गवळणी सुरात गात होते , फुगड्या घालून , फेर धरून नाचत होते.
नगारा असलेली बैलगाडी प्रथम आली.त्याआधी सोहळा प्रमुख यांची गाडी आल्यावर रथ व पालखी आल्याचे ग्रामस्थांनी जाणले.

नगारा , कुंचे , भगव्या पताका आणि टाळ मृदूंग यांचा आवाज असे वैष्णवजण , महिला , मुली , मुले यांचे आगमण झाले. पालखीचे अश्व , बैल , यांचेबरोबर फोटो काढणारे , विणेकरी , तुळस , आणि मृदूंगमणी यांचेबरोबर सेल्फी काढून घेताना , फोटो काढून घेताना शेकडो वारकरी दिसले.
संत तुकाराम महाराज मंदिरात , राम मंदिरात , आजोळघर मंदिरात , तसेच शिळा मंदिरात हजारो वारकरी दर्शनासाठी आले होते. पालखी मंडपात जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे सर्व नोंदणीकृत मानाच्या दिंड्यांना तसेच दिंडीमधील विणेकरी यांना श्रीफळ देवून विश्वस्त व सोहळाप्रमुख यांचेकडून सन्मानित करण्यात येत असताना सर्व विणेकरी या ठिकाणी शिस्तबद्ध बसले होते.
दिंड्यांनी इंद्रायणीनदीचे घाटावर महाआरती करून देहू ते पंढरपूर व पंढरपूर ते देहू अशी पायी वारीची सांगता केली.एकादशीनिमित्त फराळ करून सर्व आपआपल्या मार्गाला लागले.
वारकऱ्यांचे देहू ग्रामस्थांनी व लोकप्रतिनिधी यांचेतर्फे कमानीसमोर स्वागत केले.फुले टाकून , रांगोळ्यांनी स्वागत केले.
पिण्याच्या पाण्याची ठिकठिकाणी व्यवस्था केलेली दिसली. ..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!