ताज्या घडामोडी

कोथुर्णेतील चिमुकल्या स्वरा चांदेकर हिच्या अपहरण व गळा चिरून निर्घून खूनप्रकरणी आरोपी आणि त्याचे आईला अटक; दोघांना ता.१० आॕगष्ट पर्यत पोलिस कोठडी..

स्वराचे आपहरण झाल्यानंतर पोलिसांकडून पुणे ग्रामिणचे पोलिस अधिक्षक डाॕ.अभिनव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली गावातील सर्व घरांची तपासणी केली.

  • कोथुर्णेतील चिमुकल्या स्वरा चांदेकर हिच्या अपहरण व गळा चिरून निर्घून खूनप्रकरणी आरोपी आणि त्याचे आईला अटक; दोघांना ता.१० आॕगष्ट पर्यत पोलिस कोठडी..

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.४(प्रतिनिधी )

कोथुर्णेतील चिमुकल्या स्वरा चांदेकर हिच्या अपहरण व गळा चिरून निर्घून खूनप्रकरणी आरोपी आणि त्याचे आईला २४ तासांत अटक केली .;दोघांना ता.१० आॕगष्ट पर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचा वडगाव मावळ न्यायालयाने आदेश दिला.
आरोपी तेजस महिपती दळवी (वय-२४,रा-कोथुर्णे , ता-मावळ ) यास पोलिसांकडून चोवीस तासांमधे संशयित आरोपी म्हणून अटक केली.तपासात त्याचे आईने त्यास मदत केली किंवा पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याने सुजाता महिपती दळवी (रा-कोथुर्णे , ता-मावळ) हीस पोलिसांनी अटक केली.दोघांनाही वडगाव न्यायालयात हजर केले असता ;त्यांना ता.१० आॕगष्ट पर्यत पोलिस कोठडी सुनावली.

स्वराचे आपहरण झाल्यानंतर पोलिसांकडून पुणे ग्रामिणचे पोलिस अधिक्षक डाॕ.अभिनव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली गावातील सर्व घरांची तपासणी केली. दहा पोलिस पथके परिसरात पाठवली. तसेच श्वानपथकास पाचारण केले.यावेळी श्वानाने माग काढून स्वराचा मृतदेह शोधण्यासाठी तसेच आरोपीचा माग काढण्यासाठी मोलाची मदत केली.
मावळ बंद व फाशीची शिक्षा देण्याची सर्वपक्षिय नेते व नागरिकांकडून मागणी.

स्वरा या सात वर्षे वयाच्या चिमुरडीचा अपहरण व निर्घून खूनप्रकरणी आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी ,अशी मागणी सर्वपक्षिय नेते , महिला लोकप्रतिनिधी , आणि नागरिकांकडून करण्यात आली.

भाजप विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे यांची संतप्त प्रतिक्रिया :

भाजप आमदार उमाताई खापरे यांचेकडून स्वराचा खून झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. त्यांचेकडून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणार असल्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंञी यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मा. आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण यांनीही मृत स्वरा चांदेकर हिचे कुटूंबाची व ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आरोपींना कठोर शिक्षा ,फाशीची शिक्षा व्हावी , यासाठी प्रयत्न व पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले .

पोलिस अधिक्षक डाॕ.अभिनव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक संजय जगताप यांनी तपासाची सुञे वेगात फिरवल्याने आरोपींना अटक करण्यात यश आले.

मृताचे शवविच्छेदन डाॕक्टरांनी केल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यनंतर पुढील बाबी स्पष्ट होतील , असे पोलिसांकडून प्रसिद्धीस देण्यात आले.

मावळातील व जिल्हाचे वकिलांना अवाहन:

“क्षञीय मराठा फौडेशन तर्फे मावळ व पुणे जिल्ह्यातील वकीलांना अवाहन: क्षञीय मराठा फौडेशन चे तालुकाध्यक्ष गुलाब तिकोणे यांनी मावळ तालुका व पुणे जिल्ह्यातील वकील बांधवांना कळकळीची विनंती केली , की कोथुर्णे येथील घटनेतील आरोपींचे वकीलपञ घेवू नये , याउलट सर्वाँनी एकञ येवून सरकारी वकील व पोलिसांना सहकार्य करावे व आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी आणि मृत कु.स्वरा हिला व तिचे कुटूंबातील लोकांना न्याय द्यावा, यासाठी सहकार्य करावे.असे अवाहन करून या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत आहे..

लोणावळ्यातील घटनेची पुनरावृत्ती : .ता.१८ फेब्रुवारी २०१५ रोजी हाॕटेल कुमार रिसाॕर्ट च्या रूममध्ये कु.ईशा छगन जैन (वय-७) या चिमुरडीचा एका आरोपीने बलात्कार करून खून केला होता.त्यावेळी नागरिकांकडून ऊत्फूर्तपणे या हाॕटेलवर दगडफेक व तोडफोड केली होती , तीव्र निषेध केला .मोर्चा काढला होता.त्यावेळी सुमारे पन्नास मोर्चातील लोक दोनशे आज्ञात लोकांवर गुन्हे दाखल केले होते. काल , परवाच्या या भीषण खूण प्रकरणाला वेगळे वळण लागू नये म्हणून सुमारे पन्नास साठ पोलिसांकडून कोथुर्णे गावात व पवनानगर येथे बंदोबस्त ठेवला होता…

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!