ताज्या घडामोडी

नराधमाला लौकरात लौकर फाशीची शिक्षा द्या..

जायंट्स ग्रुप ऑफ मावळ सखी व जायंट्स ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडे..

नराधमाला लौकरात लौकर फाशीची शिक्षा द्या.. जायंट्स ग्रुप ऑफ मावळ सखी व जायंट्स ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडे.

आवाज न्यूजः राजेश बारणे, मावळ प्रतिनिधी, ५ ऑगष्ट.    

मावळ तालुक्यातील, कोथुर्णे गावात कै. स्वरा जनार्दन चांदेकर या 7 वर्षीय चिमुकलीचा लैंगिक अत्याचार करून अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली. या चिमुकलीला श्रद्धांजली देण्यासाठी तसेच आरोपी नराधमाला लौकरात,  लौकर फाशीची शिक्षा द्यावी यासाठी मराठा क्रांती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जायंट्स ग्रुप ऑफ मावळ सखी व जायंट्स ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडे यांच्यावतीने श्रद्धांजली सभा व मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत स्थानिकांनीही उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला. यावेळी मेणबत्या पेटवून निषेध व्यक्त करण्यात आला.

सभेमध्ये बोलताना अनेक मान्यवरांनी आपला निषेध अत्यंत परखडपणे व्यक्त केला तसेच नराधमाला जनसमुदायासमोर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मागणी केली.
यावेळी जायंट्स ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडेचे  संदीप गोंदेगावे, ॲड. देविदास टिळे, अध्यक्ष बाळासाहेब जामदार,  रवींद्र कोळेकर तसेच जायंट्स ग्रुप ऑफ मावळ सखीच्या अध्यक्षा   सुप्रिया पारखे,  जयश्री टिळे,  तस्मैया मुल्ला,  शिल्पा पारखी, वंदना कोळी,  वर्षा जामदार,  संगीता कोळेकर उपस्थितत होते.यंग जायंट्स ऑफ तळेगाव दाभाडे चे अध्यक्ष कु.तन्मय जामदार व कुमारी माई जामदार हे देखील उपस्थित होते.   दिलीप डोळस, अनिल धर्माधिकारी, शितल थोरवे, नीलिमा राहाणे,  सुजाता पाटील -कुलत यांनी देखील आपली विशेष उपस्थिती नोंदवली.
संपूर्ण रॅली व श्रद्धांजली सभा संपन्न होण्यासाठी पोलीस व वाहतूक पोलीस यांचे विशेष सहकार्य लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!