ताज्या घडामोडी

स्वराला तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू-भगिनींच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यात आली.

पुन्हा असा दुर्दैवी प्रकार घडू नये अशा प्रकारची अपेक्षा यावेळी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. एक सामाजिक बांधिलकीतून शिक्षकांनी निधी उभारून एका गरजवंत कुटुंबाला न्यायालयीन लढ्यासाठी मदत म्हणून योगदान दिले

आवाज न्यूजः शिवानंद कांबळे, मावळ प्रतिनिधी ९ ऑगष्ट.

कोथुर्णे येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थीनी कै. स्वरा जनार्दन चांदेकर हिच्या दुर्दैवी अंतानंतर आज तिच्या सातव्या दिवसाच्या विधीनिमित्त कोथूर्णे या गावी मावळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संघ व सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने स्वरा हिच्या पालकांना न्यायालयीन लढा देण्यात बळ मिळण्यासाठी १,७१,५५६ रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.

स्वराला तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू-भगिनींच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यात आली. पुन्हा असा दुर्दैवी प्रकार घडू नये अशा प्रकारची अपेक्षा यावेळी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. एक सामाजिक बांधिलकीतून शिक्षकांनी निधी उभारून एका गरजवंत कुटुंबाला न्यायालयीन लढ्यासाठी मदत म्हणून जे योगदान दिले ,त्यातून मावळ तालुक्याच्या शिक्षकांचा एक वेगळा आदर्श या निमित्ताने पाहवयास मिळाला आला आहे. अशा भावना याप्रसंगी उपस्थित असणाऱ्या तालुक्यातील शोकसभेस उपस्थित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

शोकसभेस संघटनांचे पदाधिकारी सुहास विटे, राजेश राऊत, राजू भेगडे,गणेश कदम, हरिभाऊ आडकर, ज्ञानेश्वर शिवणेकर, नीतीन वाघमारे, संतोष भारती, अजित मोरे, संजय ठुले,योगेश ठोसर, संदीप आडकर, विलास मोरे, नारायण गायकवाड, संतोष राणे, सुनिल शेडगे, गोरख जांभूळकर, मधुकर दळवी, नवनाथ दळवी, धोंडीबा घारे, भाग्यश्री विटे, वंदना भालेराव इत्यादी मावळ तालुक्यातील विशेषत: पवन मावळ भागातील शिक्षक बंधू भगिनी या दुख:द प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती तालुका संघाचे अध्यक्ष श्री.गेनूभाऊ मोरमारे यांनी दिली.

अद्यापही ज्या शिक्षक बंधू भगिनींना स्वराच्या न्यायालयीन लढ्यासाठी आर्थिक मदत म्हणून योगदान देण्याची इच्छा असेल त्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या यापूर्वी दिलेल्या फोन पे नंबरवर रक्कम पाठवावी ही विनंती.

प्राथमिक शिक्षक संघाच्या आव्हानाला शिक्षकांकडून देण्यात आलेल्या आर्थिक योगदानाबद्दल तसेच गटविकास अधिकारी सुधीर भागवत साहेब व गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे  यांच्या सहकार्याबद्दल आणि मावळ तालुक्यातील तमाम शिक्षक बंधू-भगिनींनी शिक्षक संघाच्या आव्हानाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद दिले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!