ताज्या घडामोडी

शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांचा कार अपघातात गंभीर जखमी झाल्याने मृत्यू…

मराठा आरक्षण साठी कणखर भूमिका घेणारा आवाज हरपला...

शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांचा कार अपघातात गंभीर जखमी झाल्याने मृत्यू…

मराठा आरक्षण साठी कणखर भूमिका घेणारा आवाज हरपला…

आवाज न्यूजः मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.१४प्रतिनिधी 

शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार विनायक मेटे यांचा कार अपघातात गंभीर जखमी झाल्याने रूग्णालयात मृत्यू झाला. त्यांचे कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कारचालक सुखरूप ;तर बाॕडीगार्ड आणि पोलिस कर्मचारी उपचार घेत आहे.

या आपघात स्थळावर श्वानपथकासह , पोलिसअधिक्षक , आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी धाव घेतली असून परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. मराठा आरक्षण साठी कणखर भूमिका घेणारा आवाज अकाली हरपला असून महाराष्ट्राचे फार मोठे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. अत्यंत तडफदार आणि स्वतःची वेगळी शैली असणारे श्री.मेटे यांनी मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळावे , यासाठी लढा दिला. त्यांचे लढ्याला सरकारनेही झुकते माप दिले , काही मागण्या मान्य झाल्या.

आज पहाटेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षण संदर्भात भेटण्यासाठी जात असताना ; खोपोली च्या पुढे घाटात माडप बोगद्याजवळ एका समोरच्या वाहनास कार जोरात धडकून हा भीषण अपघात झाला.

द्रूतगतीमार्गावर घटनास्थळाकडे तात्काळ धाव घेत लोकांनी गंभीर जखमी झालेल्या. मेटे यांना एमजीएम रूग्णलयात दाखल केले , माञ उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला , त्यांचे कारचा चालक सुखरूप असून कारमधील बाॕडीगार्ड व पोलिस कर्मचारी जखमी असून उपचार घेत आहेत.

कै.विनायक मेटे यांचे कार्य : विनायक मेटे यांचा जन्म १९७२ मधील असून ते १९९५ मधे विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. सुमारे चारवेळा ते आमदार म्हणून निवडून गेले होते. २०१४ मध्ये राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून गेले होते.त्यांनी नंतर शिवसंग्राम पक्षाची स्थापना करून ते निवडून गेले.

अरबी समुद्रात होऊ घातलेल्या छञपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या ५२ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी समाजासाठी , मराठा आरक्षण मिळावे यासाठी , मराठा महासंघ , मराठा क्रांतीमोर्चा , आदीमधे मोठ्या प्रमाणात संघटनात्मक काम केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!