ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ तळेगाव आयोजित मावळ तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा 18. 8.22 रोजी संपन्न झाला..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे प्रतिनिधी 20 ऑगष्ट 

दिनांक 13 व 14 ऑगस्ट 2022 रोजी लायन्स क्लब ऑफ तळेगाव आयोजित मावळ तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा 18. 8.22 रोजी संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून व विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

लायन सेक्रेटरी राजेंद्र झोरे यांनी उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत केले, व कार्यक्रमाचे अध्यक्ष लायन मनोहर दाभाडे यांनी प्रास्ताविक केले. लायन्स सुरेश जाधव यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना भविष्यकालीन स्पर्धेच्या आयोजन याबद्दल माहिती दिली . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माझे प्रांतपाल आदरणीय लायन दीपक शहा यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना मार्गदर्शन केले व मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना पारितोषिक देण्यात आले व त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व खेळाडूंना प्रोत्साहीत केले. लायन चंद्रकांत थिटे यांनी आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन दिनेश कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमानंतर चहापान व अल्पोहार याची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाला उपस्थित माजी प्रांतपाल दीपक शहा, हेल्थ क्लबचे चेअरमन लायन मनोहर दाभाडे, सह चेअरमन लायन चंद्रकांत थिटे, सेक्रेटरी लायन राजेंद्र झोरे, स्पोर्ट्स कमिटीचे अध्यक्ष लायन सुरेश जाधव ,वक्ते व लेखक लायन डॉक्टर शालिग्राम भंडारी, लायन दिनेश कुलकर्णी ,लायन भरत पोद्दार ,लायन निलेश मेहता, लायन शेखर चौधरी, लायन यशवंत पाटील, लायन प्रकाश पटेल ,लायन प्रशांत शहा, लायन सुनील वाळुंज ,लायन प्रमिला वाळुंज आणि अनिता बाळसराफ हे सर्वजण उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!