ताज्या घडामोडी

प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज (सी.बी.एस.ई.बोर्ड) तन्मय विश्वासराव चे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील यश

तन्मय विश्वासराव या विद्यार्थ्यास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विद्यालयाच्या प्राचार्या

प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज (सी.बी.एस.ई.बोर्ड) तन्मय विश्वासराव चे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील यश

आवाज न्यूज: गुुुलामअली भालदार  चिंचवड प्रतिनिधी 20 ऑगष्ट

चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज (सी.बी.एस.ई.बोर्ड) चा 12 वीचा विद्यार्थी तन्मय विश्वासराव या विद्यार्थ्याने 2019-20 साली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमा़र्फत आयोजित केलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत तन्मय विश्वासराव हा विद्यार्थी द्वितीय श्रेणी मिळवून शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र ठरला आहे.

15 ऑगस्ट 2022 रोजी पुणे जिल्हा परिषदेमा़र्फत गुणवंतांच्या पारितोषिक वितरण समारंभात तन्मय विश्वासराव या विद्यार्थ्यास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विद्यालयाच्या प्राचार्या सविता ट्रॅविस यांनी विद्यार्थ्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कमला शिक्षण संकुलाच्या अध्यक्षा प्रतिभा शहा तसेच; संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सविता ट्रॅविस यांचे विशेष कौतुक करून तन्मय विश्वासराव याला त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!