ताज्या घडामोडी

गणेश विसर्जन मिरवणूकीत ढोलताशा व डी.जे. च्या तालावर थिरकली तरुणाई ..

तळेगावात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच बहुतांश घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

तळेगावमध्ये  गणेश विसर्जन मिरवणूकीत तरुणाईढोलताशा व डी.जे. च्या तालावर थिरकली तरुणाई …

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे ७ सप्टेंबर.

गणेश विसर्जनाची सुरुवात. श्रीमंत सरदार दाभाडे सरकार यांच्या गणपती पासून झाली.तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या, मूर्तीदान उपक्रमास देखील नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला.

तळेगावात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच आज बहुतांश घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. तळेगाव दाभाडे येथे सातव्या दिवशी विसर्जनाची परंपरा आहे.

ढोल ताशांच्या दणदणाट, डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई, आकर्षक चित्ररथांवर विराजमान झालेल्या बाप्पांच्या मूर्ती, गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्यांची उधळण, यामुुुळे वातावरण एकदम मंगलमय झाले होते.

अशा जल्लोषपूर्ण वातावरणात  संध्याकाळी तळेगाव दाभाडे येथे गणपती विसर्जन  मिरवणुकीस प्रारंभ झाला.मानाचे गणपतीसह डोळसनाथ महाराज मंदिरापासून  गणेशोत्सव मंडळांची लाईन लागली होती.

सर्व गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्याप्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. विसर्जन मिरवणुकीसाठी तळेगाव परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!