ताज्या घडामोडी

लोणावळा नगरपरिषद कर्मचारी गणेशमुर्तीचे भजनाच्या तालात मिरवणूकीने विसर्जन ..

लोणावळा नगरपरिषद कर्मचारी गणेशमुर्तीचे भजनाच्या तालात टाळमृदूंगाच्या गजरात , आकर्षक पालखीतून व रथावर गणपतीची सजावट करून मिरवणूकीने विसर्जन करण्यात आले.

लोणावळा नगरपरिषद कर्मचारी गणेशमुर्तीचे भजनाच्या तालात मिरवणूकीने विसर्जन ..

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा ता.७ प्रतिनिधी

लोणावळा नगरपरिषद कर्मचारी गणेशमुर्तीचे भजनाच्या तालात टाळमृदूंगाच्या गजरात , आकर्षक पालखीतून व रथावर गणपतीची सजावट करून मिरवणूकीने विसर्जन करण्यात आले.

पिवळा नेहरू , डोक्यावर पांढरी शुभ्र टोपी , हातात टाळ ,,घेवून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी , विविध खात्यांचे अभियंता , अधिकारी , कर्मचारी यांनी भव्य मिरवणूक काढली होती. यावर्षी स्वातंञ्याचा अमृतमहोत्सव असलेला आकर्षक देखावा साकारला होता..पालखीला तिरंगी रंगाचे फुगे लावले होते.
सर्व अधिकारी व कर्मचारी मिरवणूकीमधे सहभागी होऊन गणपतीचे विसर्जन करण्यासाठी सह्याद्रीनगर येथील हौदावर पोहोचले . तेथे विधिवत आरती घेऊन गणरायाचे विसर्जन करण्यात आले..

येथे तुंगार्लीतील श्री सिध्दीविनायक मिञ मंडळ , तसेच श्री गणेश मिञ मंडळ यांच्या गणपतीचे विसर्जन वाजतगाजत मिरवणूकीने गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ! ! या गजरात करण्यात आले.
श्री जाखमाता देवी मंदिरातील या गणपतीची सात आश्वाच्या रथावर भव्य दिव्य अशी रोषणाई करून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली होती.

खंडाळातील सार्वजनिक गणपतीचे विसर्जनही खंडाळातील बाजारपेठ भागात मिरवणूक काढून तलावाचे पाण्यात गणपतीबाप्पाला निरोप देण्यात आला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!