ताज्या घडामोडी

मळवलीचे माजी सदस्य रऊफशेठ इनामदार यांचे निधन

मळवलीचे माजी सदस्य रऊफशेठ इनामदार यांचे निधन..

आवाज न्यूज मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ,प्रतिनिधी १२सप्टेंबर.

मळवली सदापूर ग्रूपग्रामपंचायतचे माजी सदय्य व उद्योजक रऊफशेठ दस्तगीर इनामदार (वय-६२) यांचे शुक्रवारी ता.९ रोजी पहाटे अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचे पश्चात आई , पत्नी , तीन भाऊ , दोन विवाहीत मुलगे व एक विवाहीत मुलगी , सुना , नातवंडे असा परिवार आहे.
मळवली सदापूर ग्रूपग्रामपंचायतचे माजी सरपंच उस्मानशेठ इनामदार , सामाजिक कार्यकर्ते युसूफ इनामदार व मळवलीचे पोलिसपाटील शहाजहान इनामदार हे त्यांचे बंधू होत.
आपल्या मनमिळावू स्वभावामुळे पंचक्रोशित विविध क्षेत्रातील लोकांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांचा मिञपरिवार मोठा होता.
लोणावळा येथे कै.रऊफ इनामदार यांचे पार्थिवावर पारंपारिक रितीनुसार शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!