ताज्या घडामोडी

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि मावळ प्रबोधिनीच्या संयुकत विद्यमाने विद्यार्थ्यासाठी ‘ व्यावसायिक मानसिकता विकास ‘ या कार्यशाळेचा पंचविसावा अध्याय तेरा सप्टेंबर रोजी जैन इंग्लिश स्कूल येथे पार पडला.

आत्तापर्यंत एकूण तीन हजार हून अधिक विद्यार्थ्यांना व्यावसायिक मानसिकता विकास प्रशिक्षण देण्यात आले आहे.

आवाज न्यूज:तळेगाव  दाभाडे १४ सप्टेंबर 

सामाजिक : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि मावळ प्रबोधिनीच्या संयुकत विद्यमाने विद्यार्थ्यासाठी ‘ व्यावसायिक मानसिकता विकास ‘ या कार्यशाळेचा पंचविसावा अध्याय तेरा सप्टेंबर रोजी जैन इंग्लिश स्कूल येथे पार पडला.

आत्तापर्यंत एकूण तीन हजार हून अधिक विद्यार्थ्यांना व्यावसायिक मानसिकता विकास प्रशिक्षण देण्यात आले आहे.

रोटरीच्या लिटरसी मिशन आणि यूथ डेव्हलपमेंट या उद्दिष्टांवर आधारित हा उपक्रम मावळातील वीस हून अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये राबविण्यात आला आहे आणि ” येणाऱ्या काळात जास्तीत जास्त तरूणांना हे प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराचा मार्ग निवडण्यास प्रोत्साहन देणयाचा आमचा प्रयत्न राहील. ” असे अध्यक्ष अनिश होले यांनी या प्रसंगी सांगितले.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे प्रशिक्षणाचे काम अध्यक्ष अनिश होले , यूथ डायरेक्टर भालचंद्र लेले आणि सहसचिव धनंजय मथुरे यांनी पाहिले तर यादवेंद्र खळदे, मंगेश गारोळे, रिषिकेश कुलकर्णी, विलास शहा, निलेश भोसले, अतुल हंपे, प्रभाकर निकम, इत्यादीं सदस्यांनी सहभाग घेतला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!