ताज्या घडामोडी

लोणावळा नगरपरिषदेच्यावतीने प्रधानमंञी नरेँद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता लीग भुशीडॕम मार्ग व खंडाळा ते राजमाची मार्गावर साजरा.

लोणावळा नगरपरिषदेचे पंडीत नेहरू माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच शिक्षक आणि मौलाना आझाद ऊर्दू विद्यालयाचे विद्यार्थी , डाॕ.बी.एन पुरंदरे कला , श्रीमती एस जी.गुप्ता कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालय , वलवण येथील विद्यार्थी व शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले कन्याशाळा , भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय तसेच भांगरवाडी येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय यांचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

लोणावळा नगरपरिषदेच्यावतीने प्रधानमंञी नरेँद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता लीग भुशीडॕम मार्ग व खंडाळा ते राजमाची मार्गावर साजरा.

आवाज न्यूज मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.१७ (प्रतिनिधी)

लोणावळा नगरपरिषदेच्यावतीने प्रधानमंञी नरेँद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता लीग भुशीडॕम मार्ग व खंडाळा ते राजमाची मार्गावर साजरा करण्यात आला.
सहारा पूल येथून स्वच्छता लीगला प्रारंभ झाला.

यावेळी लोणावळा नगरपरिषदेचे पंडीत नेहरू माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच शिक्षक आणि मौलाना आझाद ऊर्दू विद्यालयाचे विद्यार्थी , डाॕ.बी.एन पुरंदरे कला , श्रीमती एस जी.गुप्ता कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालय , वलवण येथील विद्यार्थी व शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले कन्याशाळा , भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय तसेच भांगरवाडी येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय यांचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

यावेळी लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडीत पाटील , नगरपरिषदेचे विविध खात्यातील, आधिकारी आस्थापना विभागप्रमुख शरद कुलकर्णी , भांडार विभागप्रमुख दत्ताञेय सुतार,बांधकाम विभागप्रमुख वैशाली मठपती , सहाय्यक ग्रंथपाल विजय लोणकर , आभय खर्डे , डाॕ.बी.एन पुरंदरे कला व गुप्ता वाणिज्य महाविद्यालयाचे शिक्षक रोहन वर्तक , डाॕ.बी.एन.पुरंदरे विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद गावडे , पंडीत नेहरू विद्यालयाचे शिक्षक बाळकृष्ण बलकवडे , तसेच नलामंदू आदी उपस्थित होते. व कर्मचारी , सफाई कर्मचारी , झाडू हातात घेवून नगरपरिषदेच्या महिला स्वच्छता कर्मचारी , तसेच नागरिक पञकार यावेळी उपस्थित होते.

पथनाट्य सादर करताना विद्यार्थी विद्यार्थीनी

यावेळी माजी नगरसेवक माणिक मराठे , हाॕटेल मालक , उद्योजक राजूशेठ सोनवणे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक आनंद गावडे यांनी केले. स्वागत श्री.बलकवडे सर यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक माणिक मराठे यावेळी म्हणाले , ” यांनी या अभियानांतर्गत लोणावळा ते भुशीगाव अशी स्वच्छता झाली हे खूप चांगले कार्य असून असेच नगरपरिषद मार्फत उपक्रम राबविल्यास शहर स्वच्छ राहण्यास मदत होईल.

ओला व सुका कचरा नागरिकांकडून वेगवेगळ्या रितीने घंटागाडीत टाकण्याची सवय लागून शहर स्वच्छतेबाबत देशात क्रमांक काढील.” यावेळी लोणावळा नगरपरिषद शाळेतर्फे पथनाट्य सहारापूल व भुशीगाव येथे सादर करण्यात आले. यामधे विद्यार्थीनी व विद्यार्थी यांचेकडून स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी , यासाठी पथनाट्यातून संदेश देण्यात आला.भुशीडॕम येथे स्वच्छता करताना.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!