ताज्या घडामोडी

औंढेखुर्द आणि मळवलीचे हद्दीत कचराकुंडी हाऊसफुल्ल..

औंढेखुर्द आणि मळवलीचे हद्दीत कचराकुंडी हाऊसफुल्ल झालेल्या दिसत असून येथे घंटागाडीची सुविधा असताना कचरा उचलला जात नाही , त्यामुळे आरोग्याची समस्या वाढली आहे.

औंढेखुर्द आणि मळवलीचे हद्दीत कचराकुंडी हाऊसफुल्ल

आवाज न्यूज मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.१७ (प्रतिनिधी)

औंढेखुर्द आणि मळवलीचे हद्दीत कचराकुंडी हाऊसफुल्ल झालेल्या दिसत असून येथे घंटागाडीची सुविधा असताना कचरा उचलला जात नाही , त्यामुळे आरोग्याची समस्या वाढली आहे.
औढे खुर्द येथे लोणावळा पवनानगरला जाणाऱ्या रस्त्यावर कचरा ओढ्यावर असलेल्या पुलाचे बाजूला टाकला जात आहे.

या कच-यापासून जा ये करणारे शेकडो ग्रामस्थ आणि पर्यटक यांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे..गावात ग्रामपंचायत मधे घंटागाडीत कचरा टाकून तो दूर कुठैतरी टाकावा , याचे ग्रामपंचायत कार्यालयाकडे कोणतेही नियोजन नाही.
मागील महिन्यात झालेल्या ग्रामसभेत सरपंच , उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांना लोणावळा नगरपरिषद कचराडेपोत का कचरा नेला जात नाही ? असे विचाराला असता; सरपंच   ग्रामविकास अधिकारी यांचेतर्फे सांगण्यात आले , की नगरपरिषद कचरा टाकायला परवानगी देत नाही..

वास्तविक लोणावळा नगरपरिषदेने देशामधे स्वच्छ सर्वेक्षण मधे सलग चार वर्षे पुरस्कार मिळविला आहे..अशी ग्रामपंचायतीचे वतीने आलेला कचरा कच-यापासून बायोगॕस प्रकल्पाचे करीता कचरा का वापरत नाही ,असा प्रश्न विचारला जातो.
औंढेखुर्द ग्रामपंचायतीचेवतीने कचरामुक्तीसाठी कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारणार आसल्याचे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांचेतर्फे ग्रामसभेत सांगितले .

औंढेखुर्द हद्दीतील हाॕटेलमधे साचलेला ओला व सुका कचरा तसेच बंगल्याचे हद्दीतील कचरा जागीच जर कंपोस्ट केला ;तर कच-यापासून दुष्परिणाम होणार नाही.
मळवलीचे ग्रामपंचायतीचे हद्दीतील मळवली ते भाजे रस्त्याचे बाजूला साबळे यांचे दुकानाजवळ तसेच बोरज रस्त्यावर अशाच प्रकारे कचराकुंडी भरभरून वहात आहे. भावसार यांचे क्लिनिक जवळ मळवली ते देवले रस्त्यावर बाजूलाच कचराकुंडी भरभरून वहात आहे , तरीही मळवली सदापूरचे ग्रूपग्रामपंचायतच्या सरपंच व पूर्ण सदस्य आणि ग्रामविकास अधिका-यांचे याकडे लक्ष नाही..या कचराकुंडी च्या दुर्गंधीयुक्त वासामुळे जा ये करणारे देवले , भाजे , मळवलीकर आणि पर्यटकांना ञास होतो..आरोग्याचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

याकडे तात्काळ दोन्हीही ग्रामपंचायतीचे प्रशासनाला पंचायत समिती व जिल्हाधिकारी यांचेकडून कार्यवाही करण्यासाठी आदेश देण्यात यावा , आसे ग्रामस्थांनी सांगितले ..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!