ताज्या घडामोडी

औंढेखुर्द : गावाजवळ जंगलात औंढे हद्दीत मिळालेल्या जखमी भेकरास कार्यकर्त्यांनी उपचार करून वनपाल यांचेकडे सुफूर्त केले.

औंढेखुर्द : गावाजवळ जंगलात औंढे हद्दीत मिळालेल्या जखमी भेकरास कार्यकर्त्यांनी उपचार करून वनपाल यांचेकडे सुफूर्त केले.

आवाज न्यूजः मच्छिंद्र मांडेकर  लोणावळा ता.१८(प्रतिनिधी )

औंढेखुर्द गावाजवळ जंगलात औंढे हद्दीत मिळालेल्या जखमी भेकरास गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उपचार करून वनपाल यांचेकडे सुफूर्त केले.

दिनेश ठाकर हे बैल चारावयास रानामधे गेले असता ; त्यांना हरीण सदृश्य भेकर हा प्राणी जखमी झालेल्या अवस्थेत मिळाला.त्याने त्यास गावातील युवक कार्यकर्ते राजेश केदारी यांचेकडे आणला..केदारी यांनी शिवदुर्ग मिञचे रेस्कु टीमला बोलावून घेतले. यावेळी सुनिल गायकवाड यांनी वनपाल व्ही.ए.कनकेश्वर यांना कुसगाव येथून बोलावून घेतले.

यावेळी लोणावळा खंडाळा येथील एच डी चुटके ,वनपाल यांचेकडे हे भेकर ताब्यात दिले. यावेळी त्याचेवर प्राथमिक उपचार करण्यात आले.नंतर त्यास पुढील उपचारासाठी औंढेखुर्द चे पोलिसपाटील विनोद बेंगळे , मोरेश्वर मांडेकर , दिनेश ठाकर , उमेश ठाकर , ग्रामपंचायतीचे सदस्य निलेश नाणेकर , तसेच संकेत मानकर आणि विकास केदारी यांचेकडून रेस्कूव्हॕनमधे बसवून भूगाव येथील संस्थेच्या ताब्यात देण्यासाठी पाठविण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!