ताज्या घडामोडी

ज्ञान आणि सेवा याचा संगम ज्याच्या व्यक्तिमत्त्वात असतो तो कैवल्याचा धनी होतो! म्हणून ज्ञान म्हणजे कल्पवृक्ष! लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी….

ज्ञान आणि सेवा याचा संगम ज्याच्या व्यक्तिमत्त्वात असतो तो कैवल्याचा धनी होतो! म्हणून ज्ञान म्हणजे कल्पवृक्ष! 

आवाज न्यूजः तळेगाव दाभाडे,  १८ सप्टेंबर .

“ज्ञान कल्पवृक्ष”……… या जगातील खरी संपत्ती ज्ञान आहे असे अनेक जण नेहमी सांगत असतात कारण, जो ज्ञानी असतो तोच जगातील खरा श्रीमंत असतो असे म्हणतात.
त्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने सुखी व्हायचे असेल तर, आपण ज्ञान मिळण्यासाठी स्वतः आग्रही असायला हव कारण, एक मात्र नक्की आहे की जो माणूस सतत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो तोच यशस्वी होतो. त्याची प्रगती होते हे शाश्वत सत्य आहे.

अर्थात हे ज्ञान कसे मिळवावे किंवा, कोणा कडून मिळवावे याचा काही एक विशिष्ट असा नियम नाही पण, एवढं मात्र निश्चित आहे की जो ज्ञान मिळवतो तोच प्रगती करतो.
हे मात्र सर्वांचं सर्वसाधारण असं निरीक्षण आहे. हे आपण लक्षात घ्यायला हवं. आता याची पुढची पायरी म्हणजे आपण ज्ञान मिळण्यासाठी कोण कोणती ठिकाणी शोधली पाहिजेत, कुठला कालावधी निश्चित केला पाहिजे, कोणाकडून आपल्याला ज्ञान प्राप्त होईल याचा शोध घेतला पाहिजे.

याचं सरळ उत्तर असा आहे की “ज्ञान मिळवण्यासाठी कुठलेही असं विशेष ठिकाण नाही, कुठलीही अशी ठराविकच वेळ नाही, किंवा विशिष्ट व्यक्तींनाही हे ज्ञानाचे विखुरलेले कण वेळोवेळी डोळसपणे आपण शोधले पाहिजे, आत्मसात केले पाहिजे आणि प्रत्यक्ष कृतीत आणले पाहिजे तरच या ज्ञान आणि विज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला श्रीमंती प्राप्त होईल आणि पर्यायाने सुख प्राप्त होईल, आणि जे शोधण्याची धडपड आपण करतो आहोत तो आनंद आपल्याला आपोआपच प्राप्त होईल.

आणखी एक दुसरा स्वीकारण्यासारखा एक सोपा मार्ग आहे.
तो म्हणजे ,एखाद्या क्षेत्रातील यशस्वी माणसाच्या अनुभवाची शिदोरी स्वीकारून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण आपल्या यशस्वी हम रस्त्यापर्यंत पोहोचण.

त्यांनी त्यांच्या कष्टातून मिळवलेल्या ज्ञानाच मनन आणि चिंतन करण व तेच प्रत्यक्ष आपल्या कृतीची त्याला जोड देऊन आपण यश प्राप्त करण हा सुद्धा एक चांगला ज्ञान मिळवण्याचा आणि पर्यायाने श्रीमंत होण्याचा सहज सुलभ मार्ग आहे. तोसुद्धा आपण स्वीकारू शकतो.
आजच्या चिंतनाचा विषय आपल्या पर्यंत पोहोचला आहे म्हणून मी आज इथेच थांबतो.
लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी ।।।।

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!