ताज्या घडामोडी

तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलीत जेए नेमच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींचा स्वागत  समारंभ रिक्रेशन हॉल मध्ये संपन्न !

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे, ३० सप्टेबर.    तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलीत जेए नेमच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींचा स्वागत  समारंभ दिनांक 27 सप्टेंबर मंगळवारी रिक्रेशन हॉल मध्ये संपन्न झाला!

प्रमुख पाहुणे नर्सिंग स्कूलचे पालकमंत्री डॉक्टर शालिग्राम भंडारी आणि हास्य योगाचे गुरुजी विठ्ठलजी गोंधळेकर तसेच प्राचार्य मोनालिसा मॅडम यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन आणि पाहुण्यांचं स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली!

योगा गुरुजी विठ्ठलपंतांनी विविध हास्य योग यांचं प्रात्यक्षिक करून कार्यक्रमाची सुरुवात करून समारंभात रंगत आणली! त्यानंतर डोळा विभागातील सौ सीमांतिनी मॅडमने उत्कृष्ट गीत सादर केले! जी जी एन एम स्कूलच्या विद्यार्थिनींनी विविध गुणदर्शन सादर करून कार्यक्रमाची विलक्षण अशी उंची वाढवली!

सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नर्सिंग स्कूलचे पालकमंत्री डॉक्टर शालिग्राम भंडारी यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय हा -“रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा”– या भावनेनेच करणे आवश्यक आहे!

त्यासाठी आपल्या आयुष्यात काही जीवनमूल्य आपण जोपासली पाहिजेत! हे अनेक उदाहरणं आणि शेरोशायरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगितले! त्यांच्या या मनोगताला विद्यार्थ्यांनी भरभरून दाद दिली!

हा अत्यंत देखणा समारंभ यशस्वी करण्यासाठी खालील विद्यार्थिनी आणि शैक्षणिक विभागातील स्टाफ यांनी खूप मेहनत घेतली त्यामुळेच हा कार्यक्रम अविस्मरणीय असा झाला! अल्पपोपहारने कार्यक्रमाची सांगता झाली!

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!