ताज्या घडामोडी
श्री रायवूड गणेश मंडळ , नवराञोत्सवानिमित्त महाभोंडला कार्यक्रम उत्सहात..
श्री रायवूड गणेश मंडळ , नवराञोत्सवानिमित्त महाभोंडला कार्यक्रम उत्सहात .
आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा ता.३ प्रतिनिधी
श्री रायवूड गणेश मंडळांच्यावतीने नवराञोत्सवानिमित्त महिलांसाठी महाभोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री रायवूड गणेशा मंडळाचे ट्रस्टचे अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष विलासभाऊ बडेकर , आणि विश्वस्थ मंडळ , महिला पदाधिकारी माजी नगरसृवक व नगरसेविका , तसेच मान्यवर यांचेकडून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
सर्व महिलांनी भोंडल्याची गाणी गायली व पारंपारिक पध्धतीने गोल फेर धरला व फुगड्या घातल्या.. यावेळी महिलांचे वतीने सर्वाना प्रसादवाटप करण्यात आला.
यावेळी पदाधिकारी रमेशा ढम , श्री.पडवळ , आदी मान्यवर उपस्थित होते.