निमगाव दावडी येथिल श्री खंडोबा देवस्थानचेवतीने नवराञौत्सवानिमित्त जोरदार कार्यक्रमाचे आयोजन …
श्री मल्हारी चे गाभाऱ्यात नुकतीच नवीन श्री खंडोबा , म्हाळसा व भानूबाई यांच्या मुर्ती विधिवत बसविण्यात आल्या आसल्याने मंदिराच्या सौदर्यामधे भर पडली आहे..
निमगाव दावडी येथिल श्री खंडोबा देवस्थानचेवतीने नवराञौत्सवानिमित्त जोरदार कार्यक्रमाचे आयोजन …
आवाज न्यूज: राजगुरुनगर, निमगाव ४ ऑक्टोबर प्रतिनिधी.
निमगाव दावडी येथिल श्री खंडोबा देवस्थानचेवतीने नवराञौत्सवानिमित्त जोरदार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
श्री मल्हारी चे गाभाऱ्यात नुकतीच नवीन श्री खंडोबा , म्हाळसा व भानूबाई यांच्या मुर्ती विधिवत बसविण्यात आल्या आसल्याने मंदिराच्या सौदर्यामधे भर पडली आहे..
या देवस्थानचे वतीने भाविकभाक्तांना ऊन , वारा , पाऊस या पासून बचाव व्हावा , यासाठी निवारा शेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
भंडारा , खोबरे यांचा मान देवून हजारो भाविकांकडून श्री खंडोबा देवाचे दर्शनाचा लाभ घेतला..झेंडू फुलांच्या माळाःनी गाभारा सुगंधने न्हावून निघाला व फुलांनी पिवळाधमक झालेला आज आठव्या माळेला पहायला मिळाला.
हजारो भाविकांकडून आज व नवराञोत्सवानिमित्त दर्शनाचा लाभ घेण्यात आल्याचे देवाचे भाक्त व दुकानदार .दशरथ वायकर आणि भाविकांकडून सांगण्यात आले..