ताज्या घडामोडी

औंढोली येथील ग्रामदैवत श्री जाखमाता देवी व श्री वाघोबा देवांचे मंदिरात घटस्थापनेनिमित्त आकर्षक मंदिराची सजावट.

औंढोली येथील ग्रामदैवत श्री जाखमाता देवी व श्री वाघोबा देवांचे मंदिरात घटस्थापनेनिमित्त आकर्षक मंदिराची सजावट.

आवाज न्यूज: मच्छिंद्र  मांडेकर, लोणावळा ता.४ प्रतिनिधी.

औंढोली येथील ग्रामदैवत श्री जाखमाता देवी व श्री वाघोबा देवांचे मंदिरात घटस्थापनेनिमित्त आकर्षक मंदिराची सजावट व फुलांची आणि विद्युत रोषणाई केलेल्या मंदिराचे मनोहारी रूप पहायला मिळत आहे.

श्री जाखमाता देवीचे भक्त व मुख्य पुजारी विलास बाप्पू मांडेकर आणि सहकारी यांचेकडून आकर्षक रंगरंगोटी , , फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई केल्याने मंदीर उजळून निघाले आहे.

मंदिरात नऊ दिवसामधे भजन व देवीचे गाण्याच्या कार्यक्रमानंतर दांडीया खेळही खेळला जात आहे..
ग्रामदैवत श्री वाघोबा देवांचे मंदिरातही आकर्षक फुलांनी , विद्युत माळा लावून सजावट केली आहे.

मुख्य पुजारी नंदकुमार रघुनाथ मांडेकर आणि ग्रामस्थांनी भजन देवीची गाणी असे दोन दिवस कार्यक्रमाचे आयोजन केले होते..मंदिर दुधिवरेखिंड मार्गावर असल्याने रोज हजारो लोक दर्शनाचा लाभ घेत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!