ताज्या घडामोडी

मावळचे आमदार, सुनिलआण्णा शेळके याच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबीरात हजारो गोरगरीब रूग्णांनी घेतला मोफत आरोग्य सुविधांचा लाभ..

अनेक आजारावर तपासणी करण्यात आली.. महात्मा फुले जन आरोग्य पञ , आरोग्य कार्ड नोंदी करण्यासाठी शेकडो लोकांनी रांगा लावल्या होत्या.

मावळचे आमदार,  सुनिल आण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबीरात हजारो गोरगरीब रूग्णांनी घेतला मोफत आरोग्य सुविधांचा लाभ..

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी ता.१६ ऑक्टोबर.

सुनिलआण्णा शेळके यांचे वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबीरात हजारो गोरगरीब रूग्णांनी घेतला मोफत आरोग्य सुविधांचा लाभ घेतला.

हृदय रोग , दंतरोग , नेञतपासणी , हाडांचे आजार , स्ञीरोग
चिकित्सा व उपचार , हाडांचे आजार , सांधेदुखी , गुडघेदुखी , मणक्याचे आजार , रक्ततपासणी , डोक्याचे आजार ,असे अनेक आजारावर तपासणी करण्यात आली.. महात्मा फुले जन आरोग्य पञ , आरोग्य कार्ड नोंदी करण्यासाठी शेकडो लोकांनी रांगा लावल्या होत्या.

सर्व रूग्णांची भोजन व चहापानाची व्यवस्था या ठिकाणी संयोजक सुनिलआण्णा शेळके युवा मंचच्या वतीने करण्यात आली होती. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व फिरते शौचालय सोय यावेळी केली होती. औषध वाटपाबरोबरच सर्व प्रकारचे रिपोर्ट व चष्मेवाटप करण्यात आले.भव्यदिव्य असे  महाआरोग्य शिबीराच्या दालनामध्ये आरोग्य तपासणी , औषधोपचार येथे करण्यात आले.

यावेळी ह.भ.प.नितीन महाराज काकडे , संजय गांधी निराधार योजनेचे नारायण ठाकर , स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष रमेशभाऊ साळवे , तसेच देवाभाऊ गायकवाड , स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी , संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक , पीडीसीसी बँकेचे संचालक माऊली दाभाडे,

खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष अंकुश आंबेकर , संतोषभाऊ राऊत , नवलाखउंबरेतील सरपंच दत्ताञेय पडवळ आदी अनेक मान्यवर , कुस्तीगीर असोसिएशनचे तानाजी काळोखे , तसेच असंख्य कार्यकर्ते आणि वैद्यकीय अधिकारी , ग्रामपंचायत कर्मचारी, तसेच अनेक मान्यवर या शिबीरास उपस्थित होते…

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!