ताज्या घडामोडी

नवीन पिढीने मदर तेरेसा हे फक्त नाव ऐकलं असेल दुःखीताचे पिडीतांचं कुष्ठरोग्यांची मनापासून सेवा करणाऱ्या मदर टेरेसा ला नोबेल पारितोषिक देऊन संपूर्ण जगाने तिचा गौरव केला!

मावळात कार्यरत असणाऱ्या आहेत त्या म्हणजे उच्च विद्याभूषित श्रीमती प्रीती वैद्य! मावळातील कान्हा फाटा जवळील अहिरवडे गावातील किनारा वृद्धाश्रमात अशाच प्रकारचे कार्य करीत आहेत!

नवीन पिढीने मदर तेरेसा हे फक्त नाव ऐकलं असेल दुःखीताचे पिडीतांचं कुष्ठरोग्यांची मनापासून सेवा करणाऱ्या मदर टेरेसा ला नोबेल पारितोषिक देऊन संपूर्ण जगाने तिचा गौरव केला!

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी,१६ ऑक्टोबर.

मावळात कार्यरत असणाऱ्या आहेत त्या म्हणजे उच्च विद्याभूषित श्रीमती प्रीती वैद्य! मावळातील कान्हा फाटा जवळील अहिरवडे गावातील किनारा वृद्धाश्रमात अशाच प्रकारचे कार्य करीत आहेत!

काल दिनांक 15 ऑक्टोबर रोजी डॉक्टर अनंत परांजपे यांच्या घरासमोरील एका परिवारातील एक वृद्ध अतिशय घाणीचं साम्राज्य असणाऱ्या परिस्थितीत होते! बघणाऱ्याच्या मनाला सुद्धा अनंत यातना देणाऱ्या अवस्थेत कदाचित ते कितीतरी दिवस होते हे परमेश्वरच जाणे!

त्यांच्यात उभ राहण्याच त्राण नाही! नैसर्गिक विधी तेथेच केलेला! सभोवतालच्या गलिच्छ वातावरणाचं त्यांना भान नाही! सहाजिकच अशा परिस्थितीत त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं! त्यामुळेच आजूबाजूतिल परिसर या वृद्धाच्या ओरडण्याने त्रासलेला! या सर्व परिस्थितीच गांभीर्य ओळखून डॉक्टर अनंत परांजपे आणि  दिलीप डोळस यांनी किनारा वृद्धाश्रमाच्या संचालिका. प्रीती वैद्य यांच्याशी संपर्क साधला! आणि सर्व सूत्र वेगाने हलली.

! निष्काम कर्मयोगी श्रीमती प्रीती वैद्यांच्या खणखणीत आवाजाने हे वृद्ध गृहस्थ निमुटपणे गाडीत बसले! त्यांना वृद्धाश्रमात नेण्यात आल! त्यांना संपूर्ण स्वच्छ आंघोळ घालून नवीन कपडे परिधान करण्यात आले! त्यांची डॉक्टरांकडून योग्य तपासणी करण्यात आली! आणि आज ते किनारा वृद्धाश्रमाच्या परिवारातील एक सदस्य झालेले आहेत!

मित्रांनो मला आठवतो आहे तो दिवस होता– दोन ऑक्टोबर 2016! दोन ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर हा लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेचा ऑक्टोबर सेवा सप्ताह म्हणून जगभर साजरा केला जातो! त्या दिवशी लायन्स क्लब तळेगावच्या सभासदांनी या वृद्धाश्रमाला भेट दिली!

 

माजी प्रांतपाल लायन दीपकभाई शहा आणि अनेक दानशूर दात्यांच्या भक्कम अशा आर्थिक पाठबळावर आज ही तीन मजली किनारा वृद्धाश्रमाची सुसज्ज भक्कम अशी इमारत उभी आहे! जवळजवळ 78 निराधार वृद्ध येथे सुरक्षित आणि सुस्थितीत वास्तव्याला आहेत! त्यांची आहार विहार आणि आरोग्याची संपूर्ण काळजी मावळातील आधुनिक मदर टेरेसा ॲडव्होकेट. प्रीती वैद्य ह्या सेवाव्रती म्हणून काळजी घेत आहेत! या त्यांच्या सेवाकार्यात त्यांचे माता-पिता तसेच त्यांचा सर्व सेवक वर्ग निष्काम कर्मयोगी म्हणून त्यांना साथ देत आहेत!

आता दिवाळी जवळ आलेली आहे! – तळेगावपासून हाकेच्या अंतर असणाऱ्या- अहिरवडे गावाजवळ असलेल्या या किनारा वृद्धाश्रमास दिवाळी फराळाच्या निमित्ताने आपण जरूर भेट द्यावी!

संत तुकारामाच्या अभंगा प्रमाणे– जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले! तोची साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा ! याची अनुभूती याची डोळा याची देही आपणही अनुभवावी हीच किमान अपेक्षा आपल्याकडून आहे!

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!