ताज्या घडामोडी
जिजामाता चौक ते गणपती चौकाकडे जाण्याचा मार्ग आज दि १८/१०/२०२२ पासुन तात्पुरते स्वरुपात एकेरी वाहतुक…
आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी, १८ ऑक्टोबर..
तळेगाव शहरातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, तळेगाव वाहतुक विभागामार्फत वाहतुक कोंडी सोडविणे करिता मा. पोलीस उप-आयुक्त सो. वाहतुक विभाग पिंपरी चिचंवड पोलीस आयुक्तालय यांचे आदेश क्र. पोउआ / वाह/नियोजन/ ४२०८/२०२२ दि.१५/१०/२०२२ अन्वये जिजामाता चौक ते गणपती चौकाकडे जाण्याचा मार्ग आज दि १८/१०/२०२२ पासुन तात्पुरते स्वरुपात एकेरी वाहतुक करण्यात आला आहे.
तरी सर्व वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा व वाहतुक नियोजनात सहकार्य करावे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाकडुन नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे..