भाजप लोणावळा शहर , भाजप जैन प्रकोष्ठ व लायन्स क्लब आॕफ लोणावळा सुप्रिमोज तर्फे कँन्सर मुक्त आभियानास लोणावाळ्यात शानदार प्रारंभ …
भाजप लोणावळा शहर , भाजप जैन प्रकोष्ठ व लायन्स क्लब आॕफ लोणावळा सुप्रिमोज तर्फे कँन्सर मुक्त आभियानास लोणावाळ्यात शानदार प्रारंभ …
आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.१७ प्रतिनिधी .
भाजप लोणावळा शहर , भाजप जैन प्रकोष्ठ व लायन्स क्लब आॕफ लोणावळा सुप्रिमोज तर्फे कँन्सर मुक्त आभियानास लोणावाळ्यात शानदार प्रारंभ झाला.
लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव , माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी , भाजपचे तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे , कँन्सरमुक्त अभियानचे सह संयोजक , भाजपा जैन प्रकोष्ठ चे उपाध्यक्ष , उद्योजक गिरीशजी पारख , लोणावळा शहर भाजपा जैन प्रकोष्ठ चे लोणावळा शहर आध्यक्ष संतोषजी चोरडीया ,महाराष्ट्र प्रदेश भाजप जैन प्रकोष्ठ , कार्यालय सह मंञी महेंद्रशेठ कांकरिया , भाजप जैन प्रकोष्ठ चे लोणावळा शहर सचिव किशोरजी पारख , लायन्स क्लब आॕफ लोणावळा सुप्रिमोज चे संस्थापक अमित वाडीवाला , लायन्स क्लब आॕफ लोणावळा सुप्रिमोज चे शहराध्यक्ष विश्वनाथ जी पुट्टोल , भाजप युवा मोर्चा कार्यकर्ते विजयभाऊ सकट , भाजपचे पदाधिकारी आरूणजी लाड आदी आनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आॕल इंडिया मायनाॕरीटी फेडरेशन तर्फे ही मोबाईल कँन्सर डिटेक्शन सेंटर , बस उपलब्ध करण्यात आली आहे.
ता.१८ रोजी पी.टी.एस येथील पोलिस कर्मचारी प्रशिक्षणार्थी आणि तेथील कर्मचारी , आधिकारी यांची तपासणी करण्यासाठी कँन्सरमुक्त बस तेथे दिवसभर खंडाळा येथे थांबेल..
ता.१९ रोजी जैन स्थानक , शाळा क्रमांक दोनजवळ , गावठाण येथे हा कँन्सरमुक्त अभियानचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भाजप जैन प्रकोष्ठ चे उपाध्यक्ष व सहसंयोजक उद्योजक , नवरत्न चिक्की चे मालक गिरीश जी पारख आणि लोणावळा शहर भाजपचे जैन प्रकोष्ठ चे शहराध्यक्ष संतोषकुमार चोरडीया यांनी आज सुमारे चाळीस रूग्णांवर यशस्वीपणे उपचार करण्यात आल्याचे आवाज शी बोलताना सांगितले…