ताज्या घडामोडी

आज दिनांक २१/१०/२०२२ शुक्रवारी रोजीची विठ्ठल रुक्मिणी , मंदीर , निळकंठ नगर , तळेगाव दाभाडे, मावळ तालुका , येथील काकड आरती व महापुजा , संपन्न.

काकड आरती व महापुजा, दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते आरती संपन्न..

 आवाज न्यूज ;.  तळेगाव दाभाडे, २१ ऑक्टोबर.

 आज दिनांक २१/१०/२०२२ शुक्रवारी रोजीची विठ्ठल रुक्मिणी , मंदीर , निळकंठ नगर , तळेगाव दाभाडे, मावळ तालुका , येथील काकड आरती व महापुजा , संपन्न.

शुक्रवारी रोजीची विठ्ठल रुक्मिणी , मंदीर , निळकंठ नगर , मावळ तालुका , जिल्हा पुणे येथील काकड आरती व महापुजा , हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सुधाकरराव देशमुख , माजी नगरसेवक गोपाळ परदेशी ,

 

पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष , विद्यमान संचालक सन्माननीय अरुण भेगडे , भोसरी येथील उद्योजक पुरी साहेब , युनीवर्सल स्पोर्ट्सचे थोरात साहेब सह कुटुंबीय , ह. भ.प. कुसुमताई जाधव सह कुटुंबीय ह.भ.प. खोंड ताई कुटुंबीय , प्राथमिक शिक्षीका सोळंकी ताई सह कुटुंबीय यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.

काकड आरतीचा अकरावा दिवस, रोज विविध मान्यवरांच्या हस्ते आरत्या केल्या जातात, पहाटे पाच वाजता काकडा सुरू केला जातो, निळकंठ नगर येथील, विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट व रेणुका भजनी मंडळ व रामभाऊ माने, मा. तहसीलदार यांच्या वतीने संपूर्ण नियोजन केले जाते. तळेगाव परिसरातील, नागरिक आरतीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. आरती संपल्यानंतर  उपस्थितांचे, श्रीफळ देऊन सन्मानीत करण्यात येत आहे.

सर्व मान्यवरांचे मंदीराच्या वतीने आभार मानले जात आहे. व जास्तीत जास्त नागरीकानी सहभाग घ्यावा अशी ट्रस्ट च्या वतीने विनंती करण्यात येत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!