ताज्या घडामोडी

सुंदर जगणे हे केवळ आपल्याच हाती असतं..

कसे ते आपण आत्ता पाहूया-- समस्या असण हे खरोखरच जिवंतपणाच लक्षण आहे..

सुंदर जगणे हे केवळ आपल्याच हाती असतं ! कसे ते आपण आत्ता पाहूया– समस्या असण हे खरोखरच जिवंतपणाच लक्षण आहे..

आवाज न्यूज : विशेष लेख, तळेगाव दाभाडे. ४ नोव्हेंबर.

जर आपल्या समस्या संपल्या तर असं समजायचं की परमेश्वराचा आपल्यावर विश्वास राहिलेला नाही! कारण “ज्यांच्या आयुष्यात समस्या नाहीत ते स्मशानातच चिरशांती घेत असतात हे शाश्वत सत्य आहे ! नशिबी आलेली प्रतिकूल परिस्थिती बदलण्याचा निश्चितच कौशल्यपूर्ण अभ्यासाने आपण प्रयत्न केलेच पाहिजेत! या आपल्या प्रयत्नांना जर यश मिळालं तर निश्चितच आपल्याला आनंदाची प्राप्ती होणार आहे पण दुर्दैवानं जर आपल्याला अपयश मिळालं तरी ही आपल्याला ठरवूनच आनंदी राहायचं आहे !

आणि ही खूणगाठ नक्की मनाशी बांधायची आहे कारण शेवटी कसं जगायचं हे आपणच ठरवायचं असत! त्यासाठी नेहमीच एक प्रसंग सांगितला जातो– इमारतीच बांधकाम चालू असतं! मजुरांची मुल आजूबाजूच्या वाळूच्या ढिगाऱ्यावर तर कधी त्याच्या खाली खेळत असतात! कधी कधी ते एकमेकांच्या शर्टाला धरून– झुकू झुकू आगीन गाडी –हा खेळ खेळतात! त्यातील एक पोरगा अर्धी चड्डी घालून रोज हिरवे फडके हलवून रेल्वेला सिग्नल देण्याचा अभिनय करतो आणि गार्डची भूमिका बजावत असतो! त्या वाटेने नेहमीच जाणाऱ्या वाटसरूने जिज्ञासेने त्या मुलाला विचारले कि बेटा तुला कधीच रेल्वेचा डब्बा किंवा इंजिन व्हावसं वाटलं नाही का? त्यावर तो शांतपणे म्हणाला की सर –माझा शर्ट धरून ही मुलं झुकू झुकू आगीन गाडी कशी खेळणार कारण त्यांना मला मागून धरण्यासाठी माझ्याजवळ शर्टच नाही! मित्रांनो त्याच्या डोळ्यातल्या कडा किंचित ओलसर झाल्याचं त्यां वाटसरूला जाणवलं पण त्यातून एक धडा मात्र त्याला मिळाला की तो मुलगा आई-वडिलांकडे हट्ट करू शकला असता! पण त्या मुलाने– कसलाही आकांडतांडव न करता त्याने दुसरा मार्ग निवडला तो म्हणजे– आहे त्या परिस्थितीला स्वीकारून त्या खेळण्यातला त्याचा आनंद तो मिळवित राहिला*! मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याही आयुष्यात आपल्या सगळ्याच इच्छा आकांक्षा पूर्ण होतातच का?त्यावर आपण रोज रोज तक्रारी जर करीत बसलो आणि नकळत चिंतेच्या चिखलात बुडत राहिलो तर आयुष्यात आपल्याला कधीच कुठलाही आनंद गवसणार नाही! म्हणूनच जगद्गुरु संत तुकाराम म्हणतात- ठेविले अनंते तैसेची राहावे! चित्ती असो द्यावे समाधान !! लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!