ताज्या घडामोडी

मनरे- तू काहे न धीर धरे !- ओ निर्मोही- मोह न जाने किनका मोह करे?

एक वेळ जग जिंकता आलं नाही तरी चालेल पण माणसाचं मन मात्र जिंकता आलं पाहिजे...डॉ. शाळीग्राम भंडारी..

मनरे- तू काहे न धीर धरे !- ओ निर्मोही- मोह न जाने किनका मोह करे?

आवाज न्यूज:  विशेष लेख,तळेगाव दाभाडे; ६ नोव्हेंबर.

एक वेळ जग जिंकता आलं नाही तरी चालेल पण माणसाचं मन मात्र जिंकता आलं पाहिजे त्यासाठी एक साधा सरळ उपाय आहे तो असा की आपल्याला समोरच्या व्यक्तीचं कौतुक करता आलच पाहिजे कारण केवळ माणूसच नाही तर प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा आपल्या स्तुतीचा भोक्ता आहे आपण कुठलीही देवाची आरती म्हणतो त्यात त्या-त्या देव-देवतांची स्तुतीच केलेली असते ही आपली रोजची उदाहरणे आहेत अर्थात देवाची आरती करणं सोपं असतं पण माणसाची कौतुकाच्या शब्दांनी आरती करण आणि तीही कुठल्याही स्वार्थाशिवाय अमलात आणण हे तितकंसं सोपं नाही अर्थात हे ज्याला जमलं त्यानेच माणसं जिंकली हे शाश्वत सत्य आहे .

यासाठी तुमचं मन शुद्ध असायला हव *मित्रांनो एक वेळ आपला खिसा भरलेला नसेल तेही चालेल पण आपलं मन नेहमी श्रीमंत आणि समुद्रासारख विशालच हव त्यात सर्वांसाठी जागा असावी याची जाणीव त्याला झाली तो जग जिंकू शकतो हेच त्रिवार सत्य आहे* असं म्हणतात की माणसाचं मन हे एखाद्या सुंदर बागेसारख असतं त्यासाठी त्या बागेतील अनावश्यक तण काढून टाकणं आणि त्याप्रमाणे मनाच्या बागेची नियमित मशागत करणे हीच खरी गरज आहे कारण ज्यांनी आपल्याला त्रास दिला वेळोवेळी केलेल्या अपमानाने आपल्या काळजाला घर पडली रागाची विखारी तणांची पेरणी केली ती वेळीच उपटून त्या मनाची मशागत ज्यांनी केली त्यांनाच आपल्या अंतकरणात समोरच्या व्यक्तीच्या कौतुकाची बाग निर्माण करण सहज शक्य असत आणि म्हणूनच मित्रांनो एकदा का हे तंत्र ज्याला जमलं त्यालाच माणसाचं मन जिंकण्याच मंत्र गवसलं असच समजायला हरकत नाही मित्रांनो म्हणून आज पासून नव्हे आतापासूनच असच आपण ठरवूया की समोरच्याला असं वाटता कामा नये कि आपण त्याची खोटी स्तुती करीत आहोत याचं भान ठेवूनच त्याच्या रंग रूपाचं त्याच्या कामाचं त्याने मिळवलेल्या यशाच अशा अनेक गोष्टींच कौतुक न विसरता करणे म्हणजेच त्याला जिंकणे हा तुमचा स्वभाव बनेल आणि तेच तुमचं व्यक्तिमत्त्व जनसामान्यांच्या हृदयामध्ये कोरल जाईल अर्थात हे काही आपण समजतो आहे तेवढं सोपं नाही त्यासाठी आपल्या मनाला आपणच वेसण घालणं तेवढच आवश्यक आहे मित्रांनो आजच असं हे चिंतन निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचलेल आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!