ताज्या घडामोडी

तळेगाव दाभाडे येथे माजी. नगरसेवक इंदरमल ओसवाल यांच्या निवासस्थानी किरीट सोमय्या यांची सदिच्छा भेट..

सहकारातील विविध संस्थांच्या विरोधात यापुढे माझा आजपासून एल्गार सुरू झाला आहे. माजी खासदार किरीट सोमय्या.

राजकीय :  तळेगाव दाभाडे येथे माजी. नगरसेवक इंदरमल ओसवाल यांच्या निवासस्थानी मा. खासदार, किरीट सोमय्या यांची सदिच्छा भेट.. 

आवाज न्यूज, तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, ६ डिसेंबर:

आंबेगाव, जुन्नर तालुक्यासह जिल्ह्यातील विविध पतसंस्थांकडून कर्ज दिल्याप्रकरणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण झाले आहे. सरकार कोणाचेही असो, शेतकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही. सहकारातील विविध संस्थांच्या विरोधात यापुढे माझा आजपासून एल्गार सुरू झाला आहे, अशी माहिती भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

किरीट सोमय्या यांनी सोमवारी (ता. ५) रोजी तळेगाव दाभाडे येथे माजी नगरसेवक इंदरमल ओसवाल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, इंदरमल ओसवाल, आंबेगाव तालुका भाजपाचे अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, माजी नगरसेवक प्रकाश ओसवाल, तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष रवींद्र माने, कामगार आघाडी कार्याध्यक्ष स्वप्नील भेगडे, इंदोरी शहर भाजपाचे अध्यक्ष संदीप नाटक, उत्तर भारतीय आघाडी तळेगाव शहर अध्यक्ष अंशू पाठक, शांतीलाल ओसवाल, विलास ओसवाल, किरण ओसवाल आदी उपस्थित होते. इंदरमल ओसवाल, गणेश भेगडे व मान्यवरांच्या हस्ते सोमय्या यांचा सत्कार करण्यात आला.

पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, समुद्रकिनाऱ्याची जमीन जे मंत्री अनिल परब यांनी खाल्ली होती, ती १५ हजार स्क्वेअर फुट जागा अनिल परब यांच्या कॉन्ट्रॅक्टरने कलेक्टरच्या हातात दिली. इथला हिशोब इथेच द्यावा लागतो. रिसॉर्ट तुटला अनिल परब व सदानंद कदमवर एफआयआर झाला. अनिल परबवर तीन केसेस सुरू आहेत. त्यामुळे कोणाच्याही मार्फत काही पण दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी अथर रोड जेलमध्ये एक कोठडी मोकळी झाली आहे. हे सदानंद कदम, अनिल परब व जे कोणी सरकारी अधिकारी त्यांना मदत करत आहेत त्यांनी लक्षात ठेवावं.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल किरीट सोमय्या यांना पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. प्रत्येकाला त्यांच्याबद्दल अभिमान आहे. कोणाची काही बोलताना चूक झाली असेल तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे व माफी देखील मागायला हवी.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!