ताज्या घडामोडी

चिंचवडगाव येथील पीएमपीएमएल बस स्थानकात चौकशीकक्ष केबिनचे उद्घाटन..

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल)चे चिंचवडगाव येथील बसस्थानकात प्रवासीयांच्या सोयीसाठी नवीन केबिनचे उद्घाटन पीएमपीएमएल मुख्यालय क्र.2 चे प्रमुख सुनिल दिवाणजी यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले.

चिंचवडगाव येथील पीएमपीएमएल बस स्थानकात चौकशीकक्ष केबिनचे उद्घाटन

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, ११ जानेवारी.

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल)चे चिंचवडगाव येथील बसस्थानकात प्रवासीयांच्या सोयीसाठी नवीन केबिनचे उद्घाटन पीएमपीएमएल मुख्यालय क्र.2 चे प्रमुख सुनिल दिवाणजी यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले.

चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, मुकेश चुडासमा, ज्येष्ठ नागरिक संघाचे बबन चव्हाण, श्री माळवदकर, पीएमपीएमएल चे महाव्यवस्थापकीय अध्यक्ष ओमप्रकाश बकेरीया शिवरत्न बाणे स्थानक प्रमुख बाळासाहेब ढोले, निवृत्त कर्मचारी चंदू वाले, प्रवासी सज्जू जगताप समवेत विविध डेपोचे प्रमुखांच्या उपस्थितीत केबिनचे पुजन करून उद्घाटन केले.

उद्घाटन प्रसंगी पीएमपीएमएल चे मुख्यालय क्र.2 चे प्रमुख सुनिल दिवाणजी म्हणाले, चिंचवड गाव येथील बस स्थानकातून विविध मार्गावर बसेस धावतात. प्रवासीयांना विविध मार्गावर धावणार्‍या बसगाड्याच्या संदर्भात अचूक माहिती आता नव्याने सुरु होत असलेल्या चौकशी कक्ष केबिन मधून स्थानक प्रमुख, कर्मचार्‍यांकडून दिली जाईल. पीएमपीएमएल तुमची आमची सर्वांची आहे. भविष्यात बहरत राहो, प्रवासीयांच्या सेवेसाठी सदैव कार्यरत राहून त्याचा प्रवास वेळेत व सुखकर कसा करता येईल, यासाठी प्रयत्नशील राहू.

चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात प्रयत्न करू असे आश्वासन देवून येत्या रक्षाबंधन सणानिमित्त जास्तीत-जास्त गाड्या सोडून प्रवासीयांची सोय केले जाईल. आमच्या चालक, वाहक कर्मचार्‍यांच्या गणवेशावर प्रवासीयांची निष्ठा आहे.
चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी पीएमपीएमएल ने उपलब्ध केलेल्या प्रवासी सुविधाबद्दल आभार व्यक्त करून या बसस्थानकात सकाळ पासून रात्रौपर्यंत शाळा, कॉलेज जाणारे मुले-मुली, महिला कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, पुण्याहून बाहेरगावी इच्छुकस्थळी जाणारे प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करतात. तसेच, अनेक ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना बसची वाट पाहण्यासाठी ताटकळत थांबावे लागते, त्यावेळी तसेच, थंडी व पावसाच्या प्रसंगात स्त्री व पुरुषांसाठी बसस्थानकातच प्रवासीयांसाठी सुलभ शौचालय नसल्यामुळे गैरसोय होते. येथे शौचायल असणे गरजेचे आहे. तसेच, गाड्याचे वेळापत्रक आदी सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात, अशी मागणी केली.

चिंचवडगावातील स्थानक प्रमुख बाळासाहेब ढोले म्हणाले, या स्थानकातून मनपा, कोथरूड, कात्रज, हडपसर, वारजे माळवाडी, भोसरी, वाल्हेकरवाडी, हिंजवडी भागात दोन पाळ्यात सुमारे 150 पीएमपीएमएल च्या बसेस धावतात. प्रवासीयांच्या प्रवासी अडचणी सोडविण्यासाठी मागणी केलेल्या केबिनची पूर्तता मुख्यालय क्र.2 चे प्रमुख सुनिल दिवाणजी यांनी केले. त्याबद्दल त्याचे विशेष आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!