ताज्या घडामोडी

“महाआरोग्य आयुर्वेदीक शिबीराचे” आयोजन पिंपळे सौदागर येथे करण्यात आले आहे.

उन्नति सोशल फाऊंडेशन व डॉ. ओंकार बाबेल ह्यांच्या ब्रह्मचैतन्य आयुर्वेद क्लिनीक तर्फे रविवारी, १५ जानेवारी रोजी "महाआरोग्य आयुर्वेदीक शिबीराचे" आयोजन करण्या. उन्नति सोशल फाऊंडेशन व डॉ. ओंकार बाबेल ह्यांच्या ब्रह्मचैतन्य आयुर्वेद क्लिनीक तर्फे रविवारी, १५ जानेवारी रोजी "महाआरोग्य आयुर्वेदीक शिबीराचे" आयोजन करण्या. उन्नति सोशल फाऊंडेशन व डॉ. ओंकार बाबेल ह्यांच्या ब्रह्मचैतन्य आयुर्वेद क्लिनीक तर्फे रविवारी, १५ जानेवारी रोजी "महाआरोग्य आयुर्वेदीक शिबीराचे" आयोजन करण्यात आले आहे..

“महाआरोग्य आयुर्वेदीक शिबीराचे” आयोजन पिंपळे सौदागर येथे करण्यात आले आहे.

आवाज न्यूज : पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, १३ जानेवारी.

उन्नति सोशल फाऊंडेशन व डॉ. ओंकार बाबेल ह्यांच्या ब्रह्मचैतन्य आयुर्वेद क्लिनीक तर्फे रविवारी, १५ जानेवारी रोजी “महाआरोग्य आयुर्वेदीक शिबीराचे” आयोजन करण्यात आले आहे.

ह्या शिबीरात संधीवात, आमवात, पोटाचे आजार, मुळव्याध, सर्दि व खोकला, डोके दुखी, अस्थमा, व इतर अनेक आजारांवर मोफत औषधोपचार करण्यात येतील.ह्यासह लहान मुलांसाठी ( ० ते १६ वयोगट ) मोफत सुवर्ण प्राशन शिबीर असणार आहे. सुवर्ण प्राशन म्हणजे सोने उगाळुन देण्याची आयुर्वेदीक पद्धत. तरी सर्व पालकांनी आपल्या मुलांची प्रतिकार शक्ती चांगली राहण्यासाठी सुवर्ण प्राशन जरुर करुन घ्यावे.

रविवारी होणार्या शिबीरात सर्वांसाठी इन्स्टाहील प्रकृती परिक्षण केले जाणार आहे.इन्स्टाहील प्रकृती परिक्षण बद्दल अधीक माहिती ; आयुर्वेदामध्ये, प्रकृती ही व्यक्तीची अद्वितीय घटना किंवा नैसर्गिक अवस्था आहे. वात, पित्त आणि कफ या तीन दोषांच्या समतोलाने प्रकृती ठरवली जाते. प्रत्येक व्यक्तीमध्ये दोषांचे एक अद्वितीय संयोजन असते, जे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वैशिष्ट्यांसाठी तसेच त्यांच्या आरोग्याच्या प्रवृत्तीसाठी जबाबदार असते. इन्स्टाहील प्रकृती परिक्षणद्वारे आपल्याला आपल्या मोबाईल वर आपली प्रकृती ओळखता येईल.

हे प्रकृती परिक्षण क्यु आर कोड द्वारे केले जाईल. पिंपळे सौदागर मधील सर्व नागरिकांना विनंती आहे कि आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरीता ह्या शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद द्यावा.

शिबीराचे स्थळ – उन्नति सोशल फाऊंडेशन, जर्वरी सोसायटी, पिंपळे सौदागर
वेळ – सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत

कुंदाताई संजय भिसे
अध्यक्षा – उन्नति सोशल फाऊंडेशन
संजय तात्याबा भिसे
संस्थापक – उन्नति सोशल फाऊंडेशन
व्हा. चेअरमन – यशदा रियलिटी ग्रुप

अधिक माहिती साठी संपर्क करा – ९१४६०८७७७७,

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!