ताज्या घडामोडी

कै.आमदार लक्ष्मण जगताप यांचे शोकसभेत, दीड कोटीचे भंडारा डोंगर मंदिरासाठी दान..

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती अध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ औसेकर यांचे सुश्राव्य प्रवचनरुपी सेवा झाली...

कै.आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे शोकसभेत, दीड कोटीचे भंडारा डोंगरावरील मंदिरासाठी दान..

आवाज न्यूज : पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी १३ जानेवारी.

कै.आमदार लक्ष्मण जगताप यांचे पवनाकाठी झालेल्या शोकसभेत  कै.लक्ष्मणभाऊ जगताप यांचे नातेवाईक व मिञपरिवार यांचेकडून दीड कोटीचे भंडारा डोंगरावरील मंदिरासाठी दान जाहीर करण्यात आले.

यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती अध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ औसेकर यांचे सुश्राव्य प्रवचन झाले.

यावेळी शोकसभेत  पुरंदरचे आमदार संजय जगताप, तसेच आमदार विलासराव लांडे , मावळातील संत तुकाराम सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब  भेगडे, तसेच पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

अनेक मान्यवरांनी यावेळी कै.लक्ष्मणभाऊ जगताप यांचे मनमिळावू स्वभाव व त्यांनी केलेल्या कामाबाबत स्तुती केली. त्यांनी नोकरीत लावलेले शेकडो कामगार शासकीय अधिकारी यांनी आमदार कै.लक्ष्मणभाऊ यांचे बंगल्यावर जावून प्रतिमेचे दर्शन घेतले , यावेळी महाराष्ट्र राज्याचे कामगारमंञी तानाजी सावंत, उज्वल निकम विशेष सरकारी वकील हेही यावेळी बंगल्यावर येवून त्यांनी लक्ष्मणभाऊ यांचे बंधू , पत्नी श्रीमती आश्विनीताई जगताप आणि नातेवाईक यांचे सांत्वन केले.

अत्यंत कमी काळात ५९ व्या वर्षी त्यांनी कार्याचा ठसा उमटवला. १९२ मधे ते नगरसेवक झाले.नंतर ते स्थायी समितीचे चेअरमन झाले, त्यांनी स्थायी समिती चेअरमन पदी कामकाज करताना  निगडीतून पंढरपूर येथे जाणाऱ्या हजारो वारकरी दिंड्यांना आदर्श मानत;  भक्ती शक्ती हे शिल्प उभारले. भाजपचे शहराध्यक्ष , विधानपरिषदेचे ,विधानसभेचे आमदार झाले. आज ते सर्वांना आदर्शवत  पिंपरी चिंचवड महापालिकेेचे. उद्यान आहे ,असे भाषणातून सांगण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!