ताज्या घडामोडी

कलापिनी महिला मंच आणि बाल भवन चा वैशिष्ट्य पूर्ण संक्रांत उत्सव…….

संक्रांत म्हणजे उत्साहाचा , आनंदाचा, छान छान वाणं देऊन एकमेकींशी संवाद साधण्याचा सण. महिला आतुरतेने ह्या सणाची वाट पाहतात.

कलापिनी महिला मंच आणि बाल भवन चा वैशिष्ट्य पूर्ण संक्रांत उत्सव…….

संक्रांत म्हणजे उत्साहाचा , आनंदाचा, छान छान वाणं देऊन एकमेकींशी संवाद साधण्याचा सण. महिला आतुरतेने ह्या सणाची वाट पाहतात.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी १९ जानेवारी.

असा हा उत्साहाचा समारंभ कलापिनीमध्ये बालभवन आणि महिला मंच यांनी मिळून अतिशय उत्साहात साजरा केला.ह्या कार्यक्रमाचे सगळ्यात मोठे आकर्षण होते संक्रांतीची एक सुंदर रांगोळी….ताज्या मटारच्या शेंगा,वालाच्या शेंगा, केशरी गाजरे, पांढरा शुभ्र मुळा, अश्या भाज्या वापरून आणि ओटीचे खण, बांगड्या, तांदूळ, सुगडी इत्यादी सामान वापरून सुंदर असा गालीचाच जणु अंथरला होता..त्यामध्ये सूर्य होता, समई होती,सुंदर आधी महिरप होती,हे सगळे साकारले होते सुप्रिया खानोलकर, दीपाली जोशी, राखी भालेराव ,मधुवंती रानडे, छाया हिंगमिरे ह्यांनी.
नुसते हळदीकुंकू न करता काहीतरी वेगळं करावं म्हणून सर्व महिलांचे छोटे छोटे खेळ घेण्यात आले . तसेच त्यांना उखाणे ही घ्यावयास सांगण्यात आले.

सर्व महिलांनी आनंदाने व उत्साहाने उखाणे घेतले आणि खेळही खेळले. काही महिलांनी आपणहून पुढाकार घेऊन काही कला सादर केल्या. त्यायोगे त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळाला आणि सगळ्यांचा आनंद द्विगुणित झाला.
सौ अंजली सहस्रबुद्धे ह्यांनी दिप प्रज्वलन केले आणि स्वागत करताना सांगितले की कलापिनी मध्ये आपले भारतीय सण आणि उत्सव नेहेमीच साजरे केले जातात त्यामुळे मुलांना त्याची ओळख होते आणि माहिती पण मिळते. सौ मधुवंती रानडे, सौ अनघा बुरसे, रश्मी पांढरे मीरा कोन्नुर,वृषाली आपटे उपस्थित होत्या.

महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. बालचमुही अतिशय उत्साहाने आला होता .
समारंभाचे सूत्रसंचालन. लीना परगी ह्यांनी केले.
हळदीकुंकू, अत्तर, तिळगुळ आणि छोटे नॅपकिन वाण म्हणून देण्यात आले. बाल भवन प्रशिक्षिका आणि सर्व कार्यकर्त्या महिलांनी अतिशय मेहनतीने हा समारंभ यशस्वी केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!