ताज्या घडामोडी

तरुणांनी विनापरवाना वाहने चालवू नका ः वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक विजया कारंडे.

महाविद्यालयीन, मुली व महिलांचा आदर करा, स्वतःची प्रतिमा जपत स्वतःच आत्मपरिक्षण करावे, लक्षात ठेवा आयुष्य मोठे आहे. वाहन चालविताना घाई करू नका. मुलींनी गाडी चालविताना धीट मनाने चालवावी, असे आवाहन केले.

तरुणांनी विनापरवाना वाहने चालवू नका ः वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक विजया कारंडे.

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी २४ जानेवारी.

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहनिमित्त चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, महिंद्रा हेवी इंजिनिअरिंग, चाकण आणि यश फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी त्या उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापक व कंपनीचे प्रतिनिधींना बोलत होत्या. अभियानाचे उद्घाटन वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजया कारंडे, महिंद्रा हेवी इंजिनिअरिंग, चाकण येथील उद्योगसमुहाच्या व्यवस्थापकीया डॉ. चंचल मेडदीया व एम.बी.ए. विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे यांच्याहस्ते यांनी हवेत फुगे सोडून करण्यात आले. यश फाऊंडेशनचे रविंद्र पाटील, प्रा. निजी साजन, प्रा. महिमा सिंग, प्रा. गुरुराज डांगरे उपस्थित होते. कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनाखाली सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजया कारंडे पुढे म्हणाल्या, पुणे, पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी व शिक्षणासाठी बाहेर गावाहून अनेक युवा पिढी त्यांची वाहने या शहरात चालवितात दोन्ही शहरात वाहतूक पोलीस कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करतात. अनेकांची गाड्याची कागदपत्रे गावी असल्यामुळे त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे, हा प्रकार टाळला गेला पाहिजे. गाडी चालविताना वाहतूकीचे नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे प्रत्येकांनी करावी. गाडीचे कागदपत्रे, वाहनपरवाना सोबत बाळगावी, जर विनापरवाना वाहने चालविताना पकडले गेले तर, चालक व वाहन मालक यांना मोठ्या रकमेचा दंड आकारला जातो. हे प्रत्येकाने विशेष करून तरुणांनी नियमांचे उल्लंघन करू नका, असे आवाहन करून तरुणांनी ट्रीपल सीट दुचाकी गाडी चालू नये, कारण दोन्ही शहरात तरुणांच्या अपघाताची संख्या लक्षणीय आहे. अनेकांना जीव गमवावा लागला तर, अनेकांना अपंगत्व देखील आले आहे. त्याचे सर्वात जास्त दुःख आम्हाला होते. कारण पोलीस देखील माणूसच आहे. काही तरूण बुलेट गाडीचे सायलेन्सरमध्ये बदल करतात. कर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्णालयातील रुग्ण, रस्त्यावरून जाणारी महिला, महाविद्यालयीन मुली यांचे लक्ष विचलित करतात. मग पोलीस कंट्रोलरूम मधून आम्हाला माहिती मिळताच आम्ही त्या तरुणांवर कडक कारवाई करतो. तरुणांनी चांगले शिक्षण घेवून स्वतःचा पायावर उभे राहून आई-वडीलांचे स्वप्न व स्वतःच्या ध्येयाची पूर्तता करा. महाविद्यालयीन, मुली व महिलांचा आदर करा, स्वतःची प्रतिमा जपत स्वतःच आत्मपरिक्षण करावे, लक्षात ठेवा आयुष्य मोठे आहे. वाहन चालविताना घाई करू नका. मुलींनी गाडी चालविताना धीट मनाने चालवावी, असे आवाहन केले.

विद्यार्थ्यांनी महाविद्यालयापासून काळभोर नगर, आकुर्डी येथील खंडोबा चौकात पथनाट्य सादर करून वाहतूक विषयी हातात फलक घेवून घोषणा देत जनजागृती केली. प्रबोधन रॅलीमध्ये 140 विद्यार्थींनी सहभाग नोंदविला सादर केलेल्या पथनाट्याने सर्व उपस्थितांची मने जिंकली त्याचे कौतुक वाहतूक पोलीस व उपस्थित नागरिकांनीदेखील यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन प्रा. नीजी साजन यांनी केले. संचालक डॉ. सचिन बोरगावे यांनी महिंद्रा हेवी इंजिनिअरिंग उद्योग संस्थेच्या व्यवस्थापिका डॉ. चंचल मेडदीया व वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजया कारंडे, यश फाऊंडेशनचे रविंद्र पाटील यांचा सत्कार केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!