ताज्या घडामोडी

श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळी श्री क्षेत्र ओझर आयोजित झी टॉकीज मनमंदिरा गजर भक्तीचा पहिले पुष्प दिनांक २२.०१.२०२३ रोजी श्री विघ्नहरास वाहण्यात आले.

हे पुष्प ह.भ.प. रुपालीदीदी सवने /परतूरकर जालना यांनी गुंफले अखंड हरीनाम सप्ताह सुरुवात होत असताना श्री क्षेत्र ओझर मध्ये प्रसंन्नतेचे वातावरण होते टाळ मृदुंगाच्या जयघोषात विघ्नहराचे सर्व धार्मिक विधी संपन्न..

श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळी श्री क्षेत्र ओझर आयोजित झी टॉकीज मनमंदिरा गजर भक्तीचा पहिले पुष्प दिनांक २२.०१.२०२३ रोजी श्री विघ्नहरास वाहण्यात आले.

आवाज न्यूज : जुन्नर प्रतिनिधी, २५ जानेवारी.

हे पुष्प ह.भ.प. रुपालीदीदी सवने /परतूरकर जालना यांनी गुंफले अखंड हरीनाम सप्ताह सुरुवात होत असताना श्री क्षेत्र ओझर मध्ये प्रसंन्नतेचे वातावरण होते टाळ मृदुंगाच्या जयघोषात विघ्नहराचे सर्व धार्मिक विधी संपन्न झाले.सांयकाळी या शुभमुहूर्तावर ठीक ७.०० वा धुपारती करण्यात आली.याआरतीसाठी व अखंड हरीनाम सप्ताहाची सुरुवात होत असताना श्री क्षेत्र ओझर मधील होणारी कीर्तन झी च्या माध्यमातून थेट प्रक्षेपित होत असताना देवस्थान ट्रस्ट साठी प्रथमच हे नाविन्य व भूषणावह बाब असल्याने ट्रस्ट ने याचे स्वरूप उद्धाटन पद्धतीने केले होते.

यासाठी.आशाताई बुचके जिल्हा नियोजन समिती सदस्य विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गणेशभाऊ कवडे ,ह.भ.प.गणेशमहाराज वाघमारे, सचिव दशरथ मांडे,खजिनदार कैलास घेगडे,विश्वस्त आनंदराव मांडे,रंगनाथ रवळे,किशोर कवडे,मंगेश मांडे,कैलास मांडे,विजय घेगडे,सरपंच मथुरा कवडे ओझर नंबर दोनच्या सरपंच तारामती कर्डक विश्वस्त श्रीराम पंडित,विश्वस्त राजश्री कवडे,तंटामुक्ती समिती अध्यक्ष ओझर दत्तात्रय कवडे तसेच महेंद्र भोर सरपंच भोरवाडी,सुधाकर नलावडे,सरपंच धोलवड,निलेश बेनके सरपंच हिवरे बु,प्रदीप थोरवे सरपंच शिरोली बु!!नामदेव नायकोडी सरपंच तेजेवाडी यांची उपस्थिती होती.

रात्रौ ७ ते ९ वेळेत ह.भ.प.रुपालीदीदी सवने परतूरकर जाना यांचे किर्तन होऊन कीर्तनकार,कीर्तन श्रोते,गायक,वादक सर्वच उपस्थितांना गणपतदादा टेंभेकर कु.प्राची मांडे तसेच श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट यांसकडून महाप्रसाद देण्यात आला. तसेच अल्पोपहार सेवा मारुती कवडे यांची होती. पहिले भावपुष्प मा. दगडू नाना मांडे यांच्या वतीने देण्यात आले .रात्री ११.००ते पहाटे पर्यंत हरिजागर करण्यात आला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!