ताज्या घडामोडी

मुळशी तालुक्यातील प्राथमिक शाळांना मोफत संगणक संच वितरण समारंभ संपन्न

संसदरत्न खासदार.सुप्रियाताई सुळे व आमदार सुनिल  शेळके यांच्या शुभहस्ते सिनेक्रॉन टेक्नॉलॉजीस प्रा.लि.यांच्या सीएसआर उपक्रमातून व शारदा फाउंडेशन यांच्या प्रयत्नाने कार्यक्रम संपन्न.

मुळशी तालुक्यातील प्राथमिक शाळांना मोफत संगणक संच वितरण समारंभ संपन्न.

संसदरत्न खासदार.सुप्रियाताई सुळे व आमदार सुनिल  शेळके यांच्या शुभहस्ते सिनेक्रॉन टेक्नॉलॉजीस प्रा.लि.यांच्या सीएसआर उपक्रमातून व शारदा फाउंडेशन यांच्या प्रयत्नाने कार्यक्रम पार पडला.

आवाज न्यूज : मुळशी प्रतिनिधी, २५ जानेवारी.

संसदरत्न खासदार.सुप्रियाताई सुळे व आमदार सुनिल  शेळके यांच्या शुभहस्ते सिनेक्रॉन टेक्नॉलॉजीस प्रा.लि.यांच्या सीएसआर उपक्रमातून व शारदा फाउंडेशन यांच्या प्रयत्नाने, मुळशी तालुक्यातील प्राथमिक शाळांना मोफत संगणक संच वितरण समारंभ आज संपन्न झाला.यावेळी महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे याचा देखील सत्कार करण्यात आला.त्याच्या आगामी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.प्रतिकूल परिस्थितीत शिवराजने मिळविलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद असुन उदयोन्मुख कुस्तीपटूंसाठी प्रेरणादायी आहे.

सिनेक्रॉन कंपनी सामाजिक बांधिलकी जोपासत कार्य करीत आहे.मावळ-मुळशीच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करुन आगामी काळात देखील कंपनीकडून भरीव सहकार्य केले जाईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. माजी सभापती.पांडाभाऊ ओझरकर, मा.सरपंच.बाबाजी शेळके, सरचिटणीस रा.यु.काँ.निलेश भोईर, .सुखदेव तापकीर हे शारदा फाऊंडेशनच्या माध्यमातून उत्तम सामाजिक उपक्रम राबवित आहेत.त्यांच्या कार्यास सदिच्छा.

या कार्यक्रम प्रसंगी माजी उपाध्यक्ष जि.प.पुणे.रणजीत शिवतरे,उपाध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.सुनिल चांदेरे,राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष.सचिन घोटकुले, राष्ट्रवादी काँग्रेस मुळशी तालुकाध्यक्ष.महादेव कोंढरे,.राजाभाऊ हगवणे, .दगडू करंजावणे,सविताताई दगडे, कोमल साखरे, सिनेक्रॉन कंपनीचे असो.डायरेक्टर  रफिक नदाफ, कायदेशीर सल्लागार.सैफन मुजावर, अ‍ॅडमिन मॅनेजर राजेश आगळे,   सागर साखरे, बाळासाहेब गोडांबे, सुरेश हुलावळे आदि.मान्यवर उपस्थित होते.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!