ताज्या घडामोडी

दारुड्याचा नाद करायचा नाय !!!..

दारुड्याचा नाद करायचा नाय !!!..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, २८ जानेवारी.

वराळे फाटा येथील सोसायटीत चार दिवस पाणी आले नाही. सोसायटीच्या सदस्यांनी नदीत जाऊन मोटार चेक केली. पाणीपुरवठा सुरळीत होता. सोसायटीकडे पाणी येणारा कॉक चेक केला. सगळे व्यवस्थित होते. अखेर काय करावे?ते सदस्यांना सुचेना.

त्यावर चार दिवसापूर्वीचा प्रसंग सगळ्यांना आठवला. एका भाडेकरूला मद्यपान करून गोंधळ घालतोय, म्हणून सोसायटीतील फ्लॅट सोडण्यास सांगितले होते. फ्लॅट सोडताना त्याने धमकी दिली होती की, सगळ्यांना अद्दल घडवून जातो.

जाता जाता त्याने सोसायटीतील टाकीचे टेरेसवरील कॉक बंद केले होते. त्यामुळे सोसायटीत पाणीच येत नव्हते. हे त्यानेच मद्यपान करून येऊन सोसायटीत सांगितले. त्यावर सदस्य म्हणाले, दारुड्याचा नाद करू नये म्हणतात, हे खरं आहे अन् सगळ्यांना हसू आवरेनासे झाले.

सौजन्य. लोकमत..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!