ताज्या घडामोडी

७४ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘साक्षी फाऊंडेशन’ व “साक्षी डायग्नोस्टिक्स” तर्फे शैक्षणिक किटचे वाटप..

मावळ दऱ्याखोऱ्यातील दुर्गम व आदिवासी भागात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किवळे येथे "साक्षी फाऊंडेशन" व "साक्षी डायग्नोस्टिक्स" यांच्याकडून शाळेतील चाळीस विद्यार्थ्यांना बहुपयोगी असे चाळीस शैक्षणिक किटचे वाटप..

७४ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘साक्षी फाऊंडेशन’ व “साक्षी डायग्नोस्टिक्स” तर्फे शैक्षणिक किटचे वाटप..

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २८ जानेवारी.

मावळ दऱ्याखोऱ्यातील दुर्गम व आदिवासी भागात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किवळे येथे “साक्षी फाऊंडेशन” व “साक्षी डायग्नोस्टिक्स” यांच्याकडून शाळेतील चाळीस विद्यार्थ्यांना बहुपयोगी असे चाळीस शैक्षणिक किटचे वाटप.

२६ जानेवारी २०२३ रोजी ७४ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मावळ दऱ्याखोऱ्यातील दुर्गम व आदिवासी भाग असलेल्या, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किवळे, येथे साक्षी फाऊंडेशन व साक्षी डायग्नोस्टिक्स,यांच्याकडून शाळेतील चाळीस विद्यार्थ्यांना बहुपयोगी असे चाळीस शैक्षणिक किट (कलर किट, मॅग्नीफायर, हुमन ॲनाटॉमी, व्हाइट बोर्ड, पेन, टेबल, ब्लूटूथ स्पीकर व खाऊ) इत्यादी साहित्याचे  कॅप फाऊंडेशन चे डायरेक्टर. साठे सर. व लोखंडे मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

कार्यक्रमासाठी किवळे गावातील ग्रामपंचायतीचे व शालेय समितीचे पदाधिकारी तसेच तरुण मंडळ, महिला भगिनी, ग्रामस्थ व सर्व शिक्षक उपस्थित होते. साक्षी फाऊंडेशन व साक्षी डायग्नोस्टिक्स मार्फत केलेल्या मदत व सहकार्याबद्दल, किल्लावाला सर व इतर सदस्य यांचे सर्व ग्रामस्थांतर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!