ताज्या घडामोडी

मधुमक्षिका पालन व रोजगाराच्या संधी विषयी MIT COLLEGE येथे कार्यक्रम संपन्न.

शिवसागर मधउद्योग च्या संचालकांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन..

मधुमक्षिका पालन व रोजगाराच्या संधी विषयी MIT COLLEGE येथे कार्यक्रम संपन्न..

शिवसागर मधउद्योग च्या संचालकांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर २९ जानेवारी.

विश्वशांती गुरुकुल शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, तळेगाव, दाभाडे, पुणे येथे दि.२८.जानेवारी रोजी मधुमक्षिका पालन व रोजगाराच्या संधी विषयी उदघाटन प्राचार्य, डॉ. विनोद साळवे सर,प्रा.अमोल ओव्हाळ, प्रमुख प्राणीशास्त्र विभाग, व शिवशागर मधुउधोग चे संचालक, विजय महाजन,  निता महाजन,रूपाली कदम यांनी केले.

यावेळी विश्वशांती गुरुकुल शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

मधुमक्षिका पालन केल्याने, रोजगाराच्या संधी कशा पध्दतीने उपलब्ध करून घेता येईल, तसेच कोणत्या सिजनला कोणते मधाचे उत्पादन करता येईल, त्यांचे संकलन, त्यांचे वितरण याबद्दलमधुमक्षिका पालन व रोजगाराच्या संधी, याबद्दल शिवशागर मधुउधोग चे संचालक, विजय महाजन,  निता महाजन,रूपाली कदम ,यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विश्वशांती गुरुकुल शाळा व कनिष्ठ महाविद्यालया तर्फे शिवसागर मधुउधोग च्या संचालकांनी दिलेल्या माहिती बद्दल सर्वांचे आभार मानले. व कार्यक्रमाची सांगता झाली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!