रस्त्याचे मागणीसाठी औंढे औंढोली ग्रामस्थ महिलांचे लोणावळा पवनानगर मार्गावर ठिय्या आंदोलन.
आमदार सुनिलआण्णा शेळके यांचेकडून आश्वासनानंतर रास्तारोको मागे..
रस्त्याचे मागणीसाठी औंढे औंढोली ग्रामस्थ महिलांचे लोणावळा पवनानगर मार्गावर ठिय्या आंदोलन.आमदार सुनिलआण्णा शेळके यांचेकडून आश्वासनानंतर रास्तारोको मागे..
आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, ३ जानेवारी.
रस्त्याचे मागणीसाठी औंढे औंढोली ग्रामस्थांचे , महिलांचे लोणावळा पवनानगर मार्गावर रास्तारोको व ठिय्या आंदोलन करण्यात आले .मावळचे आमदार सुनिल शेळके यांचेकडून आश्वासनानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला. यावेळी एमएसआरडी चे अधिकारी व बोगदा कामाचे ठेकेदार यांचे अधिकारी यांनी तोंडी आश्वासन दिले , की आठ दिवसांत सदर पुलाचे ड्रॉइंग व आराखडा दाखवू , तो पसंत पडल्यास काम पुढे चालू करून तोपर्यंत बाजूला रस्त्याचे काम थांबवू नये , असे आश्वासन दिले , त्यानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला.
यावेळी औंढेखुर्द चे सरपंच आरूण चव्हाण , उपसरपंच विकास कदम , सदस्या , ग्रामपंचायत सदस्य , देवलेचे सदस्य , पोलीस पाटील , , महिला मंडळांच्या सदस्या आदींनी घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले. माजी पंचायत समिती सदस्य व राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष दिपकशेठ हुलावळे यांनी अश्वासन दिले.तसेच आमदारांचे कानावर हे रास्तारोको बाबत सांगितले , त्यानंतर आमदार श्री.शेळके आले. एमएसआरडी चे अधिकारी आले.
आकरा ते दोन वाजेपर्यंत लोणावळा पवनानगर रस्ता पुलाजवळ महिलांचे व ग्रामस्थांचे वतीने घोषणा देत आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांचे वतीने रस्त्यावर बैठक मारत घोषणा देण्यात आल्या.
यावेळी आमदार शेळके यांचेवतीने राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दिपकशेठ हुलावळे येवून त्यांनी ऐकून घेतले.नंतर आमदार सुनिल शेळके यांनी येथे अधिका-यांचे चर्चेनंतर आम्हाला रस्ता द्यावा , पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय व पुलाचे काम सुरू केल्याशिवाय हा लोणावळा ते पौडला जाणारा वर्दळीचा रस्ता बंद करू नये , असे ग्रामस्थांचे म्हणणे लक्षात घेतले.अधिकारी यांच्याकडून ठोस आश्वासन घेवून ग्रामस्थांचे समाधान केल्यानंतर रास्तारोको , ठिय्या आंदोलन सव्वा दोन वाजता मागे घेण्यात आले.