ताज्या घडामोडी

तळेगाव दाभाडे शहरातील प्रमुख रस्त्यांचे कामे येत्या गुढी पाडव्याच्या आत पूर्ण करावीत. मा. राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे..

तळेगावं दाभाडे नगरपरिषद हद्दीत पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रस्तावित केलेल्या विकास कामांसंदर्भात सर्व विभागाच्या प्रमुखांची आढावा बैठक मा. राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न..

तळेगाव दाभाडे शहरातील प्रमुख रस्त्यांचे कामे येत्या गुढी पाडव्याच्या आत पूर्ण करावीत. मा. राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी, ३ जानेवारी.

मावळ तालुक्यातील महत्वाचे शहर तळेगांव दाभाडे नगरपरिषद हद्दीत पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रस्तावित केलेल्या विकास कामांसंदर्भात सर्व विभागाच्या प्रमुखांची आढावा बैठक मा. राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये  घेतली.

तळेगाव दाभाडे शहरात भुयारी गटार व पाणी योजनेचे काम संथ गतीने सुरु असून गेल्या काही दिवसांपासून गाव हद्दीतील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे,यासंदर्भात योग्य मार्ग काढण्यासाठी सूचना यावेळी केल्या.

आठवडे बाजारात येणाऱ्या महीलांची गैरसोय पाहता सुभाष मार्केट मध्ये महीलांसाठी शौचालय लौकरात लौकर बांधून खुली करावीत.तळेगाव दाभाडे मारुती मंदिर येथील शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये सफाई साठी एजन्सी नेमावी तसेच नगरपरिषदेच्या माध्यमातून दुकानदारांना लावण्यात येणाऱ्या करात सवलत देण्याचे सूचना केल्या.

याप्रसंगी मा.नगराध्यक्ष रविंद्र नाना दाभाडे,भा.ज.पा. शहरअध्यक्ष रविंद्र माने,सन्मानीय मा.नगरसेवक अरुण भेगडे पाटील, शोभाताई भेगडे,अमोल शेटे,.संतोषजी भेगडे पाटील,अरुण भेगडे,.सचिन जाधव,नितीन पोटे,निर्मल ओसवाल,मुख्याधिकारी. विजयकुमार सरनाईक, तळेगांव दाभाडे पोलीस निरीक्षक. नितीन लांडगे,महाराष्ट्र विदयुत विभागाचे. गजाननजी झोपे,तळेगावं नगरपरिषद क्षेत्रातील विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!