श्री. परमपूज्य आण्णासाहेब मोरे महाराज महासत्संग सोहळा मोशी येथे संपन्न..
कार्यक्रमास लाखो भाविक भक्तांनी घेतला दर्शनाचा लाभ..
श्री. परमपूज्य आण्णासाहेब मोरे महाराज महासत्संग सोहळा मोशी येथे संपन्न..कार्यक्रमास लाखो भाविक भक्तांनी घेतला दर्शनाचा लाभ.
आवाज न्यूज: पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, १२ फेब्रुवारी.
मोशी येथे २०० एकर जागेवर महासत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
कार्यक्रमात विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले होते. अथर्वशीर्ष पठण, आरोग्य शिबीर, विवाह नोंदणी सोहळा, या सर्वांचा उपस्थितांनी लाभ घेतला.भव्यदिव्य स्टेजची उभारणी करण्यात आली होती, स्टेज समोर, उत्कृष्ट रांगोळीने उपस्थितांची मने जिंकली.
श्री. परमपूज्य आण्णासाहेब मोरे महाराजांच्या आगमनाने संपूर्ण परिसरात चैतन्य निर्माण झाला होता. गुरू माऊलींच्या नामाच्या गजरात व सेवेकरींनी केलेल्या फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले.
पाहुयात कार्यक्रम स्थळाची व्हिडिओ क्लिप.