ताज्या घडामोडी

आंबवणेत नेत्र तपासणी शिबीर संपन्न,  ३१४ ग्रामस्थांनी घेतला  लाभ..

आंबवणे - कोराईगड शिक्षण संस्था आंबवणे , पुणे अंधत्व नियंत्रण सोसायटी, पुणे अंधजन मंडळ मोहमदवाडी पुणे , आणि कमुनिटी आय केअर फाउंदेशन पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आंबवणे येथे सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालयाच्या जाईआई सभागृहात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्रक्रिया शिबीर संपन्न..

आंबवणेत नेत्र तपासणी शिबीर संपन्न,  ३१४ ग्रामस्थांनी घेतला  लाभ

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १२ फेब्रुवारी.

आंबवणे – कोराईगड शिक्षण संस्था आंबवणे , पुणे अंधत्व नियंत्रण सोसायटी, पुणे अंधजन मंडळ मोहमदवाडी पुणे , आणि कमुनिटी आय केअर फाउंदेशन पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आंबवणे येथे सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालयाच्या जाईआई सभागृहात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्रक्रिया शिबीर संपन्न झाले.

 

सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून विद्यार्थ्यानी गीतातून  मान्यवरांचे स्वागत केले.
सर्व उपस्थित डॉक्टर व पाहुण्यांचा सन्मान केला. मुख्याध्यापक भटू देवरे यांनी प्रस्ताविक केले.
या प्रसंगी जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ प्रकाश रोकडे , जिल्हा अंधत्व नियंत्रण सोसायटीचे डॉ गणेश शिंदे , डॉ रामचंद्र कुदळे ,डॉ विलास तारू ,डॉ मुरलीधर आल्हाट, क कम्युनिटी आय फाउंदेशन पुणे डॉ. नितीन ओझा ,डॉ प्रांजल मेश्राम , आंबवणे प्रार्थमिक आरोग्य केंद्र डॉ.नेटके , यांनी नेत्र तपासणी केली.

आपल्या सत्काराला उत्तर देताना डॉ रोकडे म्हणाले की, कोविड काळा नंतर अलीकडे, अबाल वृद्धाना डोळ्यांच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आंम्हाला ग्रामीण भागातील गरजू लोकांना सेवा देता आली याचा आनंद आहे. या कार्यक्रमासाठी मा. नंदकुमार वाळंज यांनी सर्वतोपरी मदत केल्याने हा कार्यक्रम उत्तम पार पडत आहे.
उदघाट्न प्रसंगी कोराईगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष.नंदकुमार वाळंज , उद्योजक. बिपीन देसाई , अंबवण्याच्या माजी आदर्श सरपंच. वत्सलाताई वाळंज, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण दळवी ,उपाध्यक्ष उल्हास मानकर, तंटा मुक्त अध्यक्ष गणेश दळवी , आरोग्य समिती अद्यक्ष नवनाथ दळवी , शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष योगेश वाळंज मुख्याध्यापक भटू देवरे, प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

शिबिरात एकूण ३१४ नागरिकांची डोळे तपासणी केली.
पैकी १३२ विद्यार्थ्यांची तपासणी अंती ४९ विद्यार्थ्यांना चस्मे दिले जातील तर चाळीस वर्षा पुढील लोकांना ११० चस्मे वाटप करण्यात आले. तसेच ४३ मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करिता गरज असल्याचे आढळले त्यांचे योग्य नियोजन करून ऑपरेशन केले जाईल असे डॉ. राठोड म्हणाले.
या प्रसंगी वाळंज व संपर्क विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची , बाल आशा घर नांदगाव येथील विदयार्थ्यांची तपासणी करण्यात आली. भांबर्ड, तैलबैल सालतर, माजगाव, आंबवणे पेठशहापूर , घुसलखांब ,देवघर विसाघर येथील मोठ्या प्रमाणात जेष्ठ नागरिक यांनी शिबिराचा लाभ घेतला.

धनश्री शेलार,पूर्वा दळवी , पल्लवी वेडाळे ,शिवाजी चव्हाण,भगवान आहेर,आशा मोढवे, आशा कराळे, यांनी आरोग्य विभागाच्या वतीने काम पाहिले. वाळंज विद्यालयाच्या शिक्षक कर्मचारी विद्यार्थी यांनी योग्य नियोजनाने कार्यक्रम यशस्वी होण्या साठी मेहनत घेतली संजय कुलथे यांनी सूत्र संचालन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!