ताज्या घडामोडीनिपाणी परिसरमहाराष्ट्र

देवचंद महाविद्यालय अर्जुननगर येथे इंग्रजी व गणित विषयाची कार्यशाळा संपन्न!

निपाणी शैक्षणिक तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी सौ महादेवी नाईक यांची उपस्थिती!,

Kiran G.Patil M.No.8884357516

शुक्रवार दि. १ डिसेंबर २०२३ रोजी देवचंद महाविद्यालय अर्जुननगर येथे निपाणी परिसरातील माध्यमिक शाळांतील इंग्रजी व गणित विषयाच्या शिक्षकांच्या साठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास जलार्पण करून झाली.निपाणी शैक्षणिक तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी सौ महादेवी नाईक, साधन व्यक्ती डॉ.श्रीधर गोखले व जी एन. कुलकर्णी ,महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो. डॉ. जी.डी.इंगळे , उपप्राचार्य अशोक पवार, पर्यवेक्षिका एस पी जाधव, पर्यवेक्षक डॉ.अशोक डोनर, आय क्यू एसी समन्वयक प्रो.डॉ. पी.डी. शिरगावे आदी उपस्थित होते.

इंग्रजी व गणित हे दोन्ही विषय विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असून त्या विषयात शिक्षकांनी स्वतःला अध्यावत ठेवून विद्यार्थ्यांच्यामध्ये अभिरुची निर्माण करावी असे आवाहन निपाणी विभागाच्या बीईओ महादेवी नाईक यांनी केले. या विषयांची विनाकारण भीती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण न होता त्या विद्यार्थ्यांनी या विषयाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यासाठी शिक्षकांनी स्वतःला विद्यार्थ्यां समोर जाण्यापूर्वी अध्यावत ठेवून विविध कौशल्यांचा वापर करण्याचे त्यांनी सुचविले. आपणास इंग्रजी विषयास या महाविद्यालयातील लाभलेले सर्व प्राध्यापक वृंद अनुभवी व तज्ञ असल्यामुळे आज आपण त्या विषयांमध्ये उत्कृष्टपणे संभाषण करू शकतो असे त्यांनी नमूद केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या भाषेच्या व गणित विषयाच्या कौशल्यांचा विकास करून त्यांना विविध कौशल्यांचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन करावे.

महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो.डॉ. जी डी इंगळे म्हणाल्या की शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धतीपेक्षा विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती अतिशय उपयुक्त आणि परिणामकारक असून विद्यार्थ्यांच्या मध्ये वर्तनात होणारा बदल हा महत्त्वाचा आहे .त्यासाठी शिक्षकांनी पारंपारिक अध्यापन पद्धती ऐवजी येऊ घातलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाचा विचार करून विद्यार्थ्यांना सक्रिय करणाऱ्या तंत्रांचा वापर करावा या उद्देशानेच देवचंद महाविद्यालय अर्जुननगर आणि बीईओ निपाणी यांच्या  संयुक्त विद्यमाने येथे कार्यशाळा आयोजित केलेली असून भावी काळात जागरूकता व सकारात्मकता निर्माण करण्यासाठी देवचंद महाविद्यालय सातत्याने प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षिका एस पी जाधव  यांनी केले तर पाहुण्यांची व साधन व्यक्तींची ओळख उपप्राचार्य अशोक पवार यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कृष्णामाई कुंभार व सदानंद झळके यांनी केले तर आभार पर्यवेक्षक डॉ.अशोक डोनर यांनी मानले. दरम्यान महाविद्यालयातील विविध विभागाच्या शैक्षणिक उपक्रमांची पी पी टी डॉ किशोर गुरव यांनी सादर केली.

कार्यशाळेच्या दरम्यान माध्यमिक शिक्षकांनी आठवी ते दहावी वर्गांच्या अध्यापनातील विविध क्षमता आणि अभ्यासक्रमातील दिलेल्या घटकांच्या बाबत साधन व्यक्तींच्या कडून मार्गदर्शन घेतले. इंग्रजी विषयाचे साधन व्यक्ती सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील इंग्रजी विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ श्रीधर गोखले यांनी इंग्रजी विषयाचे अध्यापन करत असताना त्यांनी शिक्षकांना भाषेतील कौशल्य आणि व्याकरण याच्या अध्यापन सुलभ व परिणामकारकपणे कसे करता येईल व विद्यार्थ्यांचा सहभाग कसा वाढवावा याबद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

तर दुसरे साधन व्यक्ती गणित विषयातील तज्ञ सेवानिवृत्त आदर्श शिक्षक व मुख्याध्यापक श्री जी एन कुलकर्णी  यांनी गणिती विषयाचे विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन आनंदी वातावरणात व विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या पद्धतीने कसे अध्यापन करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेतून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे व शंका समाधानामुळे आलेल्या सर्व माध्यमिक शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी प्रा.मनोज काळे, प्रा.विकास माने, प्रा. कल्पना पाटील , प्रा. विनायक कुंभार , प्रा.विष्णू पाटील , प्रा.महावीर शेंडगे , प्रा. वी एस पाटील  , प्रा.नवनाथ कुंभार , प्रा.सागर परीट, अनिल खोत,आदी उपस्थित होते.हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशांत कुंभार, सिद्धू बेडर, रणजीत कोळी, नितीन वराळे , रोहित साठे आदीचे सहकार्य लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!